उलटी करताना रक्त आले ? घाबरू नका, फक्त करा याचे सेवन
घसा खराब झाला किंवा खोकला येत असला तर ज्येष्ठमध चघळण्यास किंवा त्याचे चूर्ण मधासोबत घेण्यास सांगितले जाते. परंतु, या शिवाही ज्येष्ठमधाचे अनेक फायदे आहेत. चवीला गोड असणारे ज्येष्ठमध कॅॅल्शियम, ग्लीसारायजक अॅॅसिड, अँँटी ऑक्सिडंंटस, अँँटी बायोटीक तत्वांनी परिपूर्ण आहे. ज्येष्ठमधाच्या वापराने डोळ्यांशी निगडीत विकार, तोंड येणे, घसा खराब असणे, दम लागणे, हृदयरोग तसेच जुन्या जखमांच्या उपचारामध्ये अतिशय चांगला गुण येतो.
वातावरणातील बदलांमुळे अनेकांना घशात खवखव जाणवते. घशातील या खवखवीचा त्रास औषध-गोळ्यांपेक्षा काही नैसर्गिक उपायांनी आटोक्यात आणणे शक्य आहे. यासाठी ज्येष्ठमध फायदेशीर ठरते. नियमित लहानसा ज्येष्ठमधाचा तुकडा चिघळत राहा. ज्येष्ठमधाचा वापर अनेक शतकांपासून केला जात आहे. ज्येष्ठमध हे वात, वाफ कफ, पित्त दोषांना शमवून अनेक रोगांमध्ये रामबाण इलाज म्हणून सोध्द झालेले आहे. संगीत शिकणाऱ्यांसाठी ज्येष्ठमध कंठ सुधारक म्हणून उपयोग करते. ज्येष्ठमध असो वा ज्येष्ठमध पावडर फायदे दोन्हीचे आहेत.
ज्येष्ठमध हे स्थलज आणि जलज असे दोन प्रकारचे असते. जलजाला ज्येष्ठमधाला मधुपर्णी असेही नाव आहे. हे ज्येष्ठमध दुर्मिळ असून फारच कमी ठिकाणी सापडते. स्थलज ज्येष्ठमध हे बऱ्याच ठिकाणी सापडते. या दोन्हीचा उपयोग आरोग्य आणि त्वचेसाठी करता येतो. मिसरी, अरबी, तुर्की हेदेखील प्रकार यामध्ये असतात. पण यामधील गोडी तुम्हाला वेळेनुसार कमी झालेली दिसून येते.
.jpg)
Comments
Post a Comment