'हा' डास ५०० पेक्षा अधिक अंडी घालतो, इतके दिवस जगतो ! अधिक जाणून घ्या


 

नवी दिल्ली : पावसाळ्यात डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका अधिक असतो. या काळात डास चावून झालेल्या आजारांमुळे जास्त मृत्यू होतात. यापैकी असे थोडेश डास असतात जे माणसाना चावतात आणि माणसांना त्याच्यापासून धोका निर्माण होतो. आज जाणून घेऊ डासांंच आयुष्य किती दिवसाचं असतं आणि कोणकोणते डास माणसांसाठी धोकादायक असतात.
 

किती दिवस जगतात डास ?  

डासांचा विचार केला तर ते २ महिन्यांपेक्षा अधिक दिवस जगू शकत नाहीत. मादी डास नर डासांपेक्षा अधिक दिवस जगतात. मादी डास ६ ते ८ आठवडे जिवंत राहतात. मादी डास दर ३ दिवसांनी अंडी घालतात आणि ते २ महिने जिवंत राहतात. 

जर माणसांंना डासांनपासून धोका असेल तर तो मादी डासांपासून आहे, कारण मादी डास माणसाचं रक्त पितात. नर डास मात्र झाडांच्या रसावर जिवंत राहू शकतात. मादी डासांना अंडी घालण्यासाठी रक्ताची आवश्यकता असते आणि एक डास ५०० पेक्षा अधिक अंडी देतो. डेंग्यू सारखे गंभीर आजार देखील मादी डास चावल्यामुळे होतात.

 

संपूर्ण जगभरात डासांच्या ३ हजार ५०० प्रजाती आहेत. पण यापैकी अनेक डासांपासून माणसांना काहीही धोका नसतो. असे डास झाडाच्या पानांच्या रसावर जिवंत राहतात.   

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स