रक्तातील साखरेची पातळी वाढवणारे पदार्थ खाणे टाळणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला मधुमेह नियंत्रणाच ठेवायचे असेल तर या योगासना फॉलो करा.
हलासन या योगासनासाठी जमिनीवर पाठीच्या आधारे झोपावे लागेल. श्वास घ्या आणि वरच्या दिशेने ९० अंशात पाय वरती करा. त्यानंतर कंबर आणि हिप्सला हाताने आधार द्या. त्यानंतर पाय डोक्याच्या वरती सरळ दिशेने हलवण्याचा प्रयत्न करा. पायांचा जमिनीला स्पर्श राहा आणि नंतर मूळ स्थितीत परता. हे आसन तुम्ही ३ ते ५ वेळा करू शकता. हे आसन करताना पाठीवर झोपा. त्यानंतर कंबर, पाय, हिप्स खांद्याच्या आधारे वर उचला. कंबरेला हाताचा आधार द्या. खांद्याच्या रुंदीवर लक्ष केंद्रित करा. खांदा आणि हातावर येत असल्याचे तुम्हाला जाणवेल दरम्यान मान आणि डोक्यावर तान येणार नाही याकडे लक्ष द्या. शक्य असल्यास पाय वरच्या दिशेने हलवण्याचा प्रयत्न करा. मग मूळ स्थितीतमध्ये या. तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार तुम्ही या प्रकारची पुनरावृत्ती करू शकता.
या आसनासाठी सुरुवातीला जमिनीवर पाठीच्या आधारे झोप. त्यानंतर दोन्ही पाय हाताच्या मदतीने शरीराच्या दिशेने वाकवा. श्वास घ्या आणि आपला उजवा गुडघा छातीच्या दिशेने आणत श्वास सोडा.हातांनी मांड्या पोटाच्या दिशेने आणा आणि हनुवटीने उजव्या गुडघ्याला स्पर्श करा. त्यानंतर श्वास सोडा आणि मूळ स्थितीमध्ये या. त्यानंतर डावा पाय घेऊन पुन्हा वरील सांगितल्याप्रमाणे आसन करा. तुम्ही ३ ते ५ वेळा हे आसन करू शकता.
Comments
Post a Comment