चहा घेताना चुकुनही या गोष्टींचे सेवन करू नका.
सकाळी उठल्याबरोबर अनेक जण चहाला प्राधान्य देतात. तुमचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर चहा ऐवजी व्यायामावर भर दिला पाहिजे. काही लोक आजही सकाळी चहा घेतात. तर चहाबरोबर काहींना काहीही खाण्याची सवय असते. काही गोष्टी चहा सोबत घेतल्या तर तुमचे आरोग्य बिघडू शकते. हे लक्षात घ्या.
आपल्या देशात चहा प्रेमी खूप आहेत. चहा हे लोकप्रिय झाले आहे. काही लॉक दिवसभरातील आळस दूर करण्यासाठी चहाला पसंती देतात. घरी आलेल्या कोणत्याही पाहुण्यांची चहानेही स्वागत केले जाते. लोक दुधाच्या चहासोबत ग्रीन टी, लेमन टी, ब्लॅॅक टी आणि हर्बल टी इत्यादी पितात. लक्षात ठेवा की चुकुनही काही पदार्थांसोबत चहा पिऊ नये. नाहीत्य तब्बेत बघडली म्हणून समजून जा. चहा सोबत कोणते पदार्थ कधीही खाऊ नयेत.
या गोष्टी चहासोबत पिऊ नयेत
- थंड वस्तु खाणे टाळा :
तुम्ही जर चहा घेत असाल तर काही पथ्य पाळले पाहिजे. आरोग्य तज्ज्ञांंच्या मते, गरम चहा प्यायल्यानंतर किमान अर्धा तास थंड पदार्थ कधीही खाऊ नये किंवा पिऊ नये. यासोबतच चहामध्ये थंड पदार्थ मिसळू नयेत. असे केल्याने पचनक्रियेवर मोठा परिणाम होतो.
- बेसनाचे पदार्थ खाऊ नका :
चहा घेताना तुम्ही बेसनाचे कोणतेही पदार्थ खाऊ नका. चहा पिताना बेसनाच्या वस्तू खाऊ नयेत. या दोघांच्या मिश्रणामुळे शरीराची पोषक द्रव्ये शोषण्याची क्षमता कमी होते. यामुळे पोट खराब होऊ शकते आणि पचनसंस्थेमध्ये गडबड होऊ शकते.
- हळद :
तुमचे आरोग्य चांगले असेल तर हळदीचे पदार्थ चहासोबत टाळां. तुम्ही चहा पीत असताना हळद असलेले पदार्थ खाणे टाळावे. त्यामुळे गॅॅस अॅॅसिडीटी किंवा जुलाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात. चहाची पाने आणि हळद एकमेकांच्या विरोधात काम करतात. त्यामुळे परिणाम हा तुमच्या आरोग्यावर तत्काळ होतो.
- लिंबू :
चहा आणि लिंबू असे एकत्रित घेणे टाळां. वजन कमी करण्यासाठी अनेकांना लेमन टी म्हणजेच लेमन टी प्यायला आवडते. मात्र, सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करू नये. चहाची पाने लिंबूमध्ये मिसळल्याने अॅॅसिडीटी होऊ शकते. त्यामुळे छातीत सूज, छातीत जळजळ आणि अॅॅसिडिटी होऊ शकते.
- लोहयुक्त भाज्या :
लोहयुक्त भाज्या चहासोबत कधीही खाऊ नये. तसेच तृणधान्ये, कडधान्ये, काजू यांसारखे लोहयुक्त पदार्थ चहासोबत टाळले पाहिजे. याचे कारण म्हणजे चहामध्ये ऑक्सलेट आणि टॅॅनिन असतात. त्यामुळे रिअॅॅक्शण येऊ शकते. त्यामुळे तुमच्या आरोग्याला मोठा धोका पोहोचू शकतो. त्यामुळे चहासोबत याचे कधीही सेवन करू नये.
.jpg)
Comments
Post a Comment