उन्हाळ्याच्या दिवसांत कामी येतील असे रामबाण उपाय 'या' समस्यांपासून मिळेल मुक्ती


 

  • एसिडीटीपासून आराम मिळावा यासाठी 
उन्हाळ्याच्या दिवसांत अनेकदा एसिडीटीचा अधिक त्रास होताना दिसतो. अशावेळी विविध उपाय करून देखील एसिडीटीपासून मुक्तता मिळत नाही. अशावेळी लवंगाचा एक तुकडा तुमची मदत करू शकतो. एसिडीटीचा त्रास जाणवल्यास तोंडात लवंगाचा तुकडा ठेवावा. यामुळे एसिडीटी कमी होण्यास मदत होते.
 

  • पुरळ आल्यास हे उपाय कराल 
उन्हाळ्याच्या दिवशी त्वचेच्या समस्या अधिक जाणवू लागतो. यावेळी तुम्ही काकडीचा वापर करू शकता. काकडीमध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण असत. त्वचेला जर पुरळ येण्याची समस्या जाणवत असेल तर काकडी सोलून तिचा कीस करून घ्या, हा कीस तुम्ही चेहरा आणि मानेवर लावून घ्या. यामुळे पुरळ आणि ब्लॅॅकहेड्स दूर होण्यास मदत होते. 

  • कोरडा खोकला 
उन्हाळ्याच्या दिवसात आरोग्याच्याही अनेक तक्रारी उद्भवतात. यावेळी कोरड्या खोकल्याचा त्रास अधिकतर लोकांना जाणवतो. जर तुम्हाला या दिवसांत कोरड्या खोकल्याचा त्रास होत असेल तर एका पातेल्यात दूध घेऊन त्यात ५ खजूर घाला. साधारण २५ मिनिट मंद आचेवर हे दूध उकळा. याच्या सेवनाने तुम्हाला कोरड्या खोकल्यापासून आराम मिळण्यास मदत होणार आहे.
 

  • तोंडाला येणारी दुर्गंधी 
प्रत्येकालाच ही समस्या जाणवेल अस नाही, मात्र उन्हाळ्याच्या दिवसांत तोंडाला दुर्गंधी येण्याची समस्या काहींना जाणवते. काही उपाय केल्यानंतर तात्पुरती ही समस्या दूर होते. यावर एक जालीम उपाय म्हणजे, तुम्ही तुळशीची ४-५ पाने चावून खाऊ शकता. यामुळे तुमच्या मुखाला येणारी दुर्गंधी दूर होणार आहे. 

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स