मुगाचे फायदे


 



मुगाचे फायदे :- 

  • सर्व कडधान्यांमध्ये मुग त्याच्या विशिष्ट गुणांमुळे सर्वश्रेष्ठ समजले जातात. आजारी माणसासाठी मुग अत्यंत उपयुक्त आहे. 
  • हिरव्या रंगाचे मुग अत्यंत स्वादिष्ट अधिक गुणकारी व श्रेष्ठ असतात. 
  • मुगाची खिचडी, आमटी वैगेरे पदार्थ बनवले जातात. 
  • मुगाच्या पीठाचे लाडूही पौष्टिक व स्वादिष्ट असतात. 
  • मुगापेक्षा मुगाचे पाणी अधिक आरोग्यदायी असते. मुगाचे पाणी वात, पित्त व कफ दूर करणारे असते. त्यामुळे आजारी माणसांंना ते अत्यंत हितकार असते.
  • एक ते दोन मुठी सालीचे अख्खे मुग मातीच्या गाडग्यात घालून, त्यात एक लिटर पाणी घालून मंद आचेवर शिजवावेत. नंतर ते रवीने चांगले घुसळून घ्यावे व असे पाणी आजारी माणसाला प्यायला द्यावे. चवीसाठी पाण्यात जिरे घालून तुपाची थोडी फोडणी, मीठ अगर 
  • सैंधव घालून ते पाणी प्यावे. आजारी माणसांना मुगाचे पाणी अत्यंत आरोग्यदायक असते. 
  • मुगाची आमटी व भात किंवा मुगाची खिचडी देखी आजारी माणसांसाठी अत्यंत हितकर असते. 
  • मुग रुक्ष, हलके, थंड व मधुर असतात. कफ व पित्तनाशक, किंचित वायुकारक, डोळ्यांसाठी हितकारक, जुलाबात गुणकारी, तसेच तापनाशक आहेत. 
  • जंगली मुगामध्ये अशाच प्रकारचे गुणधर्म आढळतात. 

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स