दररोज चिकन खाणाऱ्यांनो व्हा सावधान ! रक्तात मिसळतय विष, होऊ शकतात ५ आजार


        अधिक प्रमाणातील मांसाहार पचवण्यासाठी मानवी शरीर तयार नसतं. अशा परिस्थितीत जर तुम्ही दररोज चिकनचे सेवन केले तर अनेक आजारांना आमंत्रण देत असाल. या विषयावर झालेल्या अभ्यासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. नॉनवेज अथवा चिकन खाण शरीरासाठी योग्य नाही. 

       जर तुम्हाला नॉनवेज खाण आवडत असेल तर तुम्ही चिकन अतिशय प्रमाणे खात असाल. नॉनवेज हे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं काहीजण सांगतात. तर काही जण फक्त जिभेचे चोचले म्हणून चिकन आवडीने खाण पसंत करतात. दोन्ही हेतूने जर तुम्ही दररोज चिकन खात असाल तर याच्या फायद्यासोबतच नुकसान देखील आहे. आणि ते जाणून घेणे गरजेचे आहे. 

      चिकन पोल्ट्री आयटममध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे तुमच्या शरीराला मोठ्या प्रमाणात पोषणतत्व मिळत असते. चिकन ब्रेस्ट देखील ल्युसीनचा एक उत्तम स्त्रोत आहे. जे स्नायू, हाडांना वाढवण्याचे आणि दुरुस्त करण्याचे काम तसेच तग घरण्याची क्षमता आणि ताकद सुधारण्यास मदत करतात. चिकनमध्ये असलेल्या साल्मोनेला पोल्ट्री चिकनमध्ये आढळणाऱ्या बॅॅक्टेरियामुळे तुम्हाला अन्नातून विषबाधा होऊ शकते. 





दररोज चिकन खाल्यामुळे वाढतो कोलेस्ट्रोल 

चिकन लाल मांसाप्रमाणेच एलडीएल खराब कोलेस्ट्रोलची पातळी वाढवते. याचा थेट परिणाम तुमच्या हृद्यविकाराच्या जोखामीवरही होऊ शकतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही रोज चिकनचे सेवन करत असाल तर तुमच्या रक्तातील खराब कोलेस्ट्रोलची पातळी वाढू शकते. 

चिकन खाल्ल्यामुळे वाढू शकतो लठ्ठपणा 

दररोज चिकन खाणे अजिबात नाही चांगले नाही. जर तुम्हाला प्रोटीनचे सेवन करायचे असेल तर शरीरात अतिरिक्त प्रोटीन सर्वाधिक प्रमाणात स्टोर केले जाते. हे प्रोटीन फॅॅटच्या रुपात कमी करणे थोडे कठीण होते. यामुळे तुमचं वजन वाढू शकते. एका अभ्यासानुसार, आहाराचा प्रकार आणि वजन यांचा संबंध आहे. अशा स्थितीत जे लोक मांसाहार करतात त्याच्या शरीरात शाकाहार करणाऱ्या लोकांच्या तुलनेत अधिक बॉडी मास असते.



चिकनमुळे ब्लड प्रेशर होईल हाय 

जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला उच्च रक्तदाबाची तक्रार असेल तर तुम्ही तुमचा आहार काळजीपूर्वक निवडावा. जर तुम्हाला उच्च रक्तदाब असेल तर तुम्ही सॅॅच्युरेटेड फॅॅट किंवा ट्रान्स फॅॅट जास्त असलेले पदार्थ टाळावेत असा सल्ला तज्ञ देतात. ही चरबी नैसर्गिक पदार्थांमुळे आढळू शकतात, जसे कि दुग्धजन्य पदार्थ लाल मांस आणि चिकन त्वचा. 

चिकन खाल्यामुळे होऊ शकतो UTI 

चिकनच्या काही जाती मूत्रमार्गात संक्रमण किंवा युटीआयशी देखील जोडल्या जाऊ शकतात. अमेरिकन सोसायटी फॉर मायक्रोबायोलॉजीच्या जर्नल mBio मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, चिकनमुळे UTIS सह विविध प्रकारचे संक्रमण होऊ शकते. अशा परिस्थितीत ताजे चिकन खरेदी करणे आणि चिकनचे नियमित सेवन टाळणे हे फायदेशीर ठरू शकते. 

शरीरात सर्वाधिक वाढेल युरीक ऍसिड 

युरीक ऍसिड हे तुमच्या शरीरातील प्रथिनांच्या चयापचयाचे उत्पादन आहे. अशा परिस्थितीत, कोणतेही प्रथिने विशेषता: प्राणी प्रथिने जसे कि चिकन, मटण किंवा गोमांस, अंड्याचा पंधरा आणि मासे जे प्रथीनेयुक्त अन्न आहेत ते शरीरातील युरीक ऍसिड वाढवू शकतात. याचा शरीराला त्रास होतो. 




Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स