गुळवेल चूर्ण खाण्याचे फायदे -


 

गिलोय ही अनेक रोगांवर प्रभावी अशी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. गिलोय याचा मराठी अर्थ गुळवेल असा आहे.
 

गुळवेल चूर्ण खाण्याचे फायदे :- 

  • रोग प्रतिकारशक्ती वाढते :- गिलोय ही इम्युनिटी बुस्टर म्हणूनही ओळखली जाते. रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी गुळवेल खूप उपयुक्त आहे. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी आणि Immune system  मजबूत करण्यासाठी गिलोयचा वापर फायदेशीर आहे. यासाठी आपण दररोज गुळवेल चूर्ण किंवा गुळवेलचा काढा सेवन करून याचा फायदा मिळवू शकता. 
  • संधिवात रुग्णांसाठी फायदेशीर :- गिलोयमध्ये सांध्यातील सूज व वेदना कमी करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे गुळवेल ही संधिवात, वातरक्त अशा आजारात फायदेशीर ठरते. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी नियमित गुळवेलचा काढा सेवन करावा. 
  • डायबिटीस कंट्रोल करते :- गिलोय ही मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूपच गुणकारी असल्याचे सिद्द झालेले आहे. विशेषतः टाईप-२ प्रकारच्या मधुमेही रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर असते. गिलोय रक्तातील साखरेची पातळी वाढविण्यासही मदत करते.
     
  • कफाचे आजार कमी करते :- श्वसनाशी संबंधित दमा, सर्दी, खोकला यासारखे कफाचे आजार दूर ठेवण्यासाठी गिलोयचे सेवन उपयोगी असते. यावेळी, आपण गिलोय चूर्ण किंवा गुळवेलीचा काढा करून पिल्यास या समस्येपासून दूर राहण्यास मदत होते. 
  • पाचक प्रणाली मजबूत करते :- गिलोय ही रोगप्रतिकार शक्तीबरोबरच आपली पाचक प्रणालीही मजबूत करते. गिलोयचे दररोज सेवन केल्याने गॅॅस, बद्धकोष्ठता यासारख्या पोटातील समस्यांंपासून मुक्तता मिळते. 
  • तापावर गुणकारी :- आयुर्वेदात गिलोयचा वापर हा प्रामुख्याने तापामध्ये केला जातो. बदलत्या हवामानामुळे येणारे ताप, व्हायरल ताप किंवा डेंग्यू, स्वाइन फ्लू, मलेरियाचा ताप यामध्ये गिलोय प्रभावी कार्य करते.  

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स