कडुलिंबाच्या पानांचे आरोग्यास फायदे
कडुलिंबाच्या पानांचे आरोग्यास फायदे
- शरीरात कुठेही खाज येत असेल तर कडुलिंबाची पेस्ट लावल्याने फायदा होतो. यासाठी ताजी कडुलिंबाची पाने बारीक करून खाज असलेल्या भागावर लावा. यामुळे खाजेपासून सुटका मिळेल.
- कोंडा झाल्यास एका पातेल्यात पाणी घालून कडूलिंबाची पाने उकळा आणि पाणी हिरवे झाल्यावर गॅॅस बंद करा. आता कडुलिंबाचे पाणी थंड होण्यासाठी ठेवून द्या. शॅॅम्पू लावल्यानंतर या पाण्याने केस धुवा.
- कडुलिंबाची पाने बारीक करून कीटक चावलेल्या ठिकाणी देखील लावता येतात. हे कीटकांंव्दारे पसरणारे संक्रमण टाळेल.
- शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी कडुलिंबाची पाने बारीक करून भाजीच्या रसासोबत पिऊ शकतात.
- केस अकाली पांढरे होण्याची समस्येवरही कडुलिंब मदत करतो. कडूलिंबाची पावडर दररोज टाळूवर लावल्याने केस अकाली पांढरे होण्यास बंद होतात.
.jpg)
Comments
Post a Comment