कान दुखतोय ? इन्फेक्शनही झालंय ? हळदीचा वापर करून असा दूर करा तुमचा त्रास....
हळदीतील दाहक-विरोधी गुणधर्म तुमच्या कानाचा संसर्ग बरा करण्यासाठी उपयुक्त आहेत. हळदीचा वापर कसा करावा ते जाणून घेऊया.
हळद व नारळाचे तेल :-
हळदीच्या पावडरच्या वापराने कान दुखणे आणि इन्फेक्शनमध्ये आराम मिळतो. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे कानाच्या नसांना आराम देण्यास मदत करतात. ते वापरण्यासाठी, न चमचे खोबरेल तेलात एक चमचा हळद पावडर मिसळा. त्यानंतर हे मिश्रण ४ ते ५ मिनिटे गॅॅसवर गरम करा. यानंतर ते गॅॅसवरून उतरवा आणि कोमट झाल्यावर कानात तेलाचे काही थेंब कापसाच्या सहाय्याने टाका. यानंतर कानाचे छिद्र कापसाने झाकून टाका.
हळदीचे पाणी :-
या उपायासाठी एक कप पाणी घ्या. त्यात चिमुटभर हळद घालून उकळा. यानंतर हे पाणी गॅॅसवरून काढून थोडे कोमट होऊ द्या. कोमट पाण्याचे काही थेंब कानात टाका. यामुळे कानातल्या घाणीमुळे होणारा त्रास आणि संसर्ग कमी होतो. तसेच कानातील मळ मऊ होऊन सहज बाहेर येतो.
हळद आणि लसणाचे तेल :-
हे तेल बनवण्यासाठी लसणाच्या २ ते ३ कळ्या बारीक करा. यानंतर एका पॅॅनमध्ये सुमारे दोन चमचे खोबरेल तेल टाका. आता त्यात ठेचलेला लसून आणि चिमुटभर हळद घालून गरम करा. हे तेल साधारण चार ते पाच मिनिटे उकळू द्या. यानंतर गॅॅसवरून काढून गाळून घ्या. कान दुखत असल्यास या तेलाचे काही थेंब टाका.
मात्र कानाच्या अनेक आजारांमध्ये घरगुती उपायांचा अवलंब करू नये. जर तुम्हाला सतत कानात वेदना होत असतील तर कोणत्याही प्रकारचे तेल वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. तसेच, लहान मुलाला कान दुखत असल्यास ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या.
.jpg)
Comments
Post a Comment