चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी हे करा घरगुती उपाय -


 

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्याचे हे आहेत घरगुती उपाय :-
 

         चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यासाठी अनेकजण बाजारातील महाग असणाऱ्या एन्टी एजींग क्रीमचा वापर करतात. यासाठी याठिकाणी चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यासाठी काही घरगुती आयुर्वेदिक उपायांची माहिती खाली दिली आहे. 

  • खोबरेल तेल : चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या असल्यास खोबरेल तेल उपयोगी पडते. खोबरेल तेलात अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असून खोबरेल तेल हे त्वचेसाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर प्रमाणे काम करते. यामुळे त्वचा मुलायम बनते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. चेहऱ्यावर सुरकुत्या पडू नये यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या चेहऱ्याला खोबरेल तेल लावून हलका मसाज करावा. 
  • ऑलिव्ह ऑइल : खोबरेल तेलाप्रमाणेच आपण ऑलिव्ह ऑइलचाही वापर करू शकता. यामध्येही अँटीऑक्सिडंट, व्हिटामिन-A आणि व्हिटामिन- E मुबलक असते. त्यामुळे दररोज एक चमचा ऑलिव्ह तेलाने चेहऱ्यावर मसाज केल्याने सुरकुत्या पडत नाहीत. 
  • मध : चमचाभर मधात लिंबाचा रस मिसळून ते मिश्रण चेहऱ्यावर लावावे. यामुळेही चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन चेहरा चमकदार होईल.
     
  • अंड्याचा पांढरा भाग : अंड्याचा पांढरा भाग वाटीत घेऊन त्यामध्ये चमचाभर लिंबू रस आणि अर्धा चमचा मध घालून मिश्रण तयार करावे व ते चेहऱ्यावर लावावे. १५ मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवावा. अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्याने त्वचेच्या पेशींचे आरोग्य सुधारून चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात. 
  • बनाना मास्क : एक पिकलेले केळे घेऊन ते चांगले कुस्करून घ्यावे. त्यानंतर त्यात एक चमचा संत्र्याचा रस आणि एक चमचा दही घालून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून १५ ते २० मिनिटांनी चेहरा धुवून घ्यावा. बनाना मास्कमुळे त्वचा खेचली जाऊन चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यासाठी मदत होते. 

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स