असा असावा वाढत्या वयातील मुलांचा आहार.
वाढत्या वयात मुलांचा आहार कसा असावा. मुलांची शारीरिक वाढ कशी होईल याबाबत अनेक प्रश्न पालकांच्या मनात असतात. वाढत्या वयानुसार मुलांच्या शारीरिक रचनेमध्ये अनेक बदल होत असतात. तसेच वयानुसार मुलांची भूक देखील वाढत जाते. खाण्याबाबत आवडीनिवडी बदलतात. मग अशा वेळी मुलांना कोणते खाद्यपदार्थ द्यावे ही चिंता आईला सतावत असते. ५ वर्ष आणि त्यावरील वय वर्षाची मुल तर शाळेमध्ये देखील जातात.यादरम्यान त्यांची शारीरिक हालचाल अधिक होते.
५ वर्षाच्या मुलांना कोणते खाद्यपदार्थ द्यावेत ?
वाढत्या वयानुसार मुलांच्या आहारामध्ये देखील बदल होतो. या वयातील मुलांना दूध, पपई, केळ, सफरचंद अशाप्रकारची फळ तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर भाज्यांमध्ये बटाटा, पालक, पनीर मुलांना द्या. दुग्धजन्य पदार्थ म्हणजे चीज, तुपाचा देखील मुलांच्या आहारामध्ये समावेश असुद्या. अंड, काही प्रमाणास मांसाहारी पदार्थ, मुलांना द्या.सुका मेव्यामध्ये काजू, बदाम तुम्ही मुलांना देऊ शकता.
५ वर्षाच्या मुलांनी किती खावं ?
वय वर्ष ५ असलेल्या मुलांच्या आहारामध्ये पोषक तत्वांचा समावेश असण गरजेचं आहे. नियमित पुरेशा प्रमाणात मुलांच्या शरीराला पोषक तत्वांचा पुरवठा झाला पाहिजे. कॅलरी-१२०० ते १४००, फॅॅट २५ ते ३० टक्के, फॅॅट -फ्री-मिल्क - २ कप, मांस आणि सोयाबीन- ८५-११५ ग्रॅॅम, फळ - १.५ कप, भाज्या- १ कप ते १.५ कप, धान्य ११५ ते १४० ग्रॅॅम मुलांना योग्य प्रमाणात योग्य आहार दिला की त्यांचा शारीरिक विकास देखील चांगल्या पद्धतीने होतो.
.jpg)
Comments
Post a Comment