कणीस खाण्याचे फायदे
कणीस खाण्याचे फायदे :-
- दात मजबूत होतात :- कणीस खाल्यामुळे दात मजबूत होतात. त्यामुळे लहान मुलांना कणीस आवर्जून खाऊ घाला.
- सर्दी कमी होते :- कणसाचे दाणे खाऊन झाल्यानंतर ते कणीस टाकून देऊ नका. कणसाचे दोन तुकडे करा आणि मधल्या भागाचा सुगंध घ्या. यामुळे सर्दी कमी होते.
- कफचा त्रास कमी होतो :- कणीस खाऊन झाल्यानंतर त्याला वाळवून ठेवा आणि त्यानंतर त्याला जाळून त्याची राख गरम पाण्यात टाकून त्याची वाफ घेतल्याने कफचा त्रास कमी होऊ शकतो.
- कागद-कापडासाठी उपयुक्त :- कागद-कापडासाठी मक्यापासून बनवलेला स्टार्च हर उपयुक्त ठरतो. मॉडीफाइड स्टार्चचा उपयोग प्लास्टिक, अक्रीकल, मोल्ड, असिड इ. साठी केला जातो.
- किडनी स्टोन :- मक्याच्या कणसातील केस किडनीसाठी उपयोगी आहेत. हे तुमच्या किडनीत साठलेले साठलेले विषारी पदार्थ व नायट्रेेट बाहेर काढण्याचे काम करतात. यामुळे किडनी स्टोनचा धोका कमी होतो. जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल तर कणीस खाणे सुरु करा.
- रक्त तयार होण्यास उपयोगी :- जर तुमचे रक्त पातळ असेल व जखम झाल्यावर रक्तस्त्राव थांबत नसेल तर कॉर्न तुमची मदत करेल. विटामिन के भरपूर प्रमाणात असल्यामुळे हे रक्त घट्ट करण्याच्या प्रक्रियेस चालना देते. यामुळे जखम झाल्यास रक्त कमी वाहते.
- हृदयरोगापासून बचाव :- मक्याच्या कणसांच्या केसांमुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित राहून लट्ठपणा कमी होतो. कोलेस्टेरॉल व लट्ठपणा हृदयरोगाना आंमत्रण देतो. यासाठी मक्याच्या कणसाच्या केसांचे सेवन करायला हवे.

Comments
Post a Comment