अवेळी जेवण आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे सध्या बऱ्याच समस्या आजकाल मागे लागतात. चुकीच आहार आणि बाहेरील खाण्याने शरीरात फॅॅट जमा होऊ लागतं. शरीरात फॅॅट अधिक वाढलं की, ते तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलच्या रुपात जमा होण्यास सुरुवात होते. मानवी शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली की हृदयाला होणाऱ्या रक्तपुरवण्यावर परिणाम होतो. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता असते.
अशा परिस्थितीत जर तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली तर ती कमी करण्यावर भर दिला पाहिजे. यासाठीच कोलेस्ट्रॉल वाढण्याच्या संकेतांकडे तुम्ही लक्ष दिल पाहिजे. तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं की, त्याची लक्षणे हात पायांवर दिसून येतात. जाऊन घेऊया ही लक्षणे कोणती आहेत. - बोटांमध्ये होतात प्रचंड वेदना
ज्यावेळी तुमच्या शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढू लागतं, तेव्हा तुमच्या हाताच्या तसच पायाच्या बोटांंमध्ये वेदना जाणवू शकतात. यामागे एक महत्त्वाचं कारण असत ते म्हणजे, हाताच्या आणि पायाच्या धमन्या या लांब असतात. या धमन्यांमध्ये ज्यावेळी कोलेस्ट्रॉल जमा होतं. त्यानंतर बोटांमध्ये वेदना जाणवू लागतात. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेदना जाणवत असतील तर वेळीच लक्ष द्यावं. अचानक जर तुमच्या त्वचेचा रंग बदलत असेल तर ते काळजीचे कारण ठरू शकते. कारण ज्यावेळी तुमच्या शरीरात वाईट कोलेस्ट्रॉन वाढू लागते, तेव्हा तुमच्या त्वचेचा रंग बदलू लागतो. यावेळी तुमच्या त्वचेचा रंग हलका पिवळा दिसू लागण्याची शक्यता आहे.
- हाता पायांवर केसांमध्ये वाढ
तुमच्या हातापायावरील केस गळू लागलेत किंवा त्यांची वाढ अचानक झपाट्याने होतेय का ? जे ही गोष्ट तुमच्यासोबत होत असेल तर काळजी घ्या. कारण हे लक्षण तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याच असू शकतो. यावर वेळीच लक्ष देण फायदेशीर ठरेल. - नखांच्या रंगामध्ये होणारा बदल
कोलेस्ट्रॉल वाढलं की तुमच्या त्वचेच्या रंगामध्ये बदल होतो. मात्र त्याचप्रमाणे तुमच्या नखांच्या रंगांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. यावेळी त्वचेच्या रांगाप्रमाणे नखांचा रंगही पिवळा दिसण्याची शक्यता आहे.
Comments
Post a Comment