आपलं हृदय निरोगी राहण्यासाठी उन्हाळ्यात थंड पाणी पिणं टाळां.


 

           आपल्याला उन्हाळ्यात अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. खासकरून अशा वेळी आपल्याला खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. उन्हाळ्यात अनेकांना थंड पाणी प्यावेसे वाटते. गर्मी मध्ये थंड पाणी पिण्याचे अनेक तोटेही आहेत. तुम्हाला याकडे दुर्लक्ष होऊन चालणार नाही. 

          आपल्याला उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे. मुळात आपल्या शरीरात ८ ते १० ग्लास तरी पाणी जाणं आवश्यक आहे. उष्माघाताचाहि त्रास सध्या वाढू लागला आहे. त्यामुळे पुष्कळ पाणी पिण हे आपल्यासाठी गरजेचे आहे. आपल्या शरीराला डिहायड्रेट ठेवण हे आपल्यासाठी गरजेचे आहे.त्यातून तुम्ही साधं पाणी  उन्हाळ्यात पिण आवश्यक आहे त्यातून फ्रीजमधील थंड पाणी पिण आपल्यासाठी अत्यंत धोकादायक आहे . तेव्हा थंड पाणी प्यायल्याने तुम्हाला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो. थंड पाणी उन्हाळ्यात प्यायल्याने तुम्हाला खालील आजारांचा सामना करावा लागू शकतो.

 


  • दातांचा त्रास : 
            थंड पाणी प्यायल्याने तुम्हाला दातांचा त्रास होऊ शकतो. त्यातून दातांची सेन्सेटिव्हिटी वाढू शकते. अशावेळी अतिथंड पाणी शक्यतो टाळावे. रोज थंड पाणी पिऊ नये. याने दात खराब होऊ शकतात. 

  • पचनक्रियेवर परिणाम : 
             गर्मी मध्ये थंड पाणी प्यायल्याने तुम्हाला पोटाचे विकार होऊ शकतात. तुमची पचनसंस्था बिघडू शकते. थंड पाण्याचा परिणाम पोटावर लवकर होतो. 

  • वजन : 
             अशावेळी तुम्हाला तुमचे वजन कमी करता येत नाही. यातून तुमच्या शरीराला जास्त वाढीव वजनाची सवय लागू शकते. 


  • घसा खवखवणे :
           अनेकांना उन्हाळ्यातही सर्दीचा सामना करावा लागतो. त्यातून तुम्ही जर का थंड पाणी पीत असाल तर तुमच्यावर त्याचा अधिकच परिणाम व्हायला वेळ लागत नाही. याचा परिणाम श्वसननलीकेवर होऊ शकतो. 

  • हृदयाचे ठोके मंदावतात ? 
          उन्हाळ्यात थंड पाणी प्यायल्याने तुमच्या रक्तवाहिन्यावर परिणाम होऊ शकतो तेव्हा अशावेळी तुम्ही योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. तेव्हा उन्हाळ्यात शक्यतो थंड पाणी पिण टाळावे. कारण यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स