चामखीळ घालवण्याचे हे आहेत सोपे घरगुती उपाय
त्वचेवर चामखीळ येणे -
त्वचेवर चामखीळ असण्याची समस्या अनेक लोकांना असते. चामखीळमुळे कोणताही विशेष त्रास होत नसला तरीही चामखीळ दिसायला चांगले वाटत नाहीत, यामुळे सुंदरताही खराब होत असते. यासाठी चामखीळ काढण्यासाठी उपयुक्त उपायांची माहिती खाली दिली आहे.
चामखीळ जाण्यासाठी हे करा घरगुती उपाय :
- कांद्याचा रस :- कांद्याचा रस काढून नियमितपणे सकाळी व संध्याकाळी चामखीळ वर लावल्यास चामखीळ जाण्यास मदत होते.
- दोरा बांधणे :- चामखीळ वर दोरा बांधल्यामुळे त्यातील रक्तप्रवाह कमी होऊन काही दिवसांनी चामखीळ निर्जीव होऊन गळून पडते.
- बटाटा :- कापलेला बटाटा तात्काळ चामखीळ वर लावून घासावा. दिवसातून ३ ते ४ वेळा असे केल्याने चामखीळ सुकून पडण्यास मदत होते.
- लसूण :- लसूण पाकळी मोडून चामखीळ वर लावून घासावी. असे काही दिवस नियमितपणे केल्यास चामखीळची मस्से सुखून गळून पडण्यास मदत होते.
- लिंबाचा रस :- चामखीळच्या जागेवर लिंबाचा रस लावल्याने चामखीळची समस्या दूर होते. यासाठी कापसाने लिंबाचा रस चामखीळवर लावला. लिंबू उकडून लावल्यानेही चामखीळ दूर होण्यास मदत होते.
- तूप आणि खाण्याचा चुना :- चामखीळवर तूप आणि खायचा चुना मिक्स करून लावल्याने ५ ते ६ दिवसात चामखीळ निघून जाण्यास मदत होते.

Comments
Post a Comment