कानातून पाणी येणे याची कारणे व उपचार

 कानातून पाणी येणे :- कानाच्या विविध तक्रारी वरचेवर होत असतात. कानातून पाणी गळणे ही त्यापैकीच एक समस्या आहे.या त्रासाला ओटोरिया (otorrhea) असेही म्हणतात. हा त्रास सामान्य असला तरीही याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कारण वेळीच उपचार न झाल्यास कानात इन्फेक्शन वगैरे होऊन अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. 


कानातून पाणी येण्याची कारणे :- 

  • प्रामुख्याने बॅॅक्टेरिया, वायरस आणि फंगल इन्फेक्शन होऊन कानातून पाणी येते. 
  • कानाच्या मधल्या भागात इन्फेक्शन झाल्याने ओटिटिस मीडियामुळे कानातून पाणी येऊ लागते. 
  • कानाच्या पडद्याला छिद्र पडल्याने देखील कानातून पाणी येऊ लागते. 
  • सर्दी, खोकला, टाॅॅन्सिल्स, वाढलेले अॅॅडेनायडस, अॅॅलर्जिक राइनाइटिस व सायनस सूज यामुळे नाक आणि घशातील बैक्टेरिया आणि व्हायरस हे कानात प्रवेश करून तेथे इन्फेक्शन निर्माण करतात त्यामुळेही कानातून पाणी येते. 
  • लहान मुलात टाॅॅन्सिल्स व अॅॅडिनॉइडसच्या वारंवार होणाऱ्या इन्फेक्शनमुळे कानातून पाणी येण्याचा त्रास अधिक होतो. 
  • कानात काडी, पेन्सिल इ. तत्सम वस्तू घालण्याच्या सवयीमुळे कानाच्या पडद्याला इजा होऊन कानातून पाणी येते. 
  • मोठ्या आवाजामुळे किंवा विमान उड्डाण करताना, स्कूब ड्रायव्हिंग यामुळे अचानक कानातील दाब वाढल्याने कानाच्या पडद्यास इजा होऊन कानातून पाणी येऊ लागते. 
कानातून पाणी येत असेल तर काय करावे?                                                                                                   कानातून पाण्यासारखा स्त्राव येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशावेळी कान दुखायला सुरुवात झाल्यास, कान सुजल्यास लागलीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळीच उपचार न केल्यास यामुळे ऐकण्याच्या शक्तीवर परिणाम होवून बहिरेपणाही होऊ शकतो.                                                                                                                                       तसेच कानाभोवतीचा महत्त्वाचा भाग म्हणजे मेंदू, मेंदूत हे कानातील इन्फेक्शन पसरल्यास मेंदूला सूज येणे, चक्कर येणे, मेंदूज्वर अशा गंभीर समस्या उद्भवतात. त्यामुळे कानातून काही स्त्राव येत असेल तर त्यावर लागलीच डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणेच योग्य ठरते. कानातून पाणी येत असेल तर कोणतेही घरगुती उपाय करीत बसू नये. सरळ कानाच्या डॉक्टरकडे जावे. 

कानातून पाणी येणे यावरील उपचार :-                                                                                                         कोणत्या कारणांमुळे कानातून पाणी येत आहे त्यानुसार यावरील उपचार ठरतात. जर कानात इन्फेक्शन झाल्याने कानातून पाणी येत असेल तर, त्यावर तुमचे डॉक्टर अँँटीबायोटिक इअर ड्राॅॅप्स देतील. या औषधाने कानातील संसर्ग नियंत्रणात आणता येतो. जर औषधोपचाराने कानातून पाणी येणे थांबले नाही तर ऑपरेशन करावे लागते. पडद्याचे छिद्र दुरुस्त करण्यासाठी कानाच्या पडद्याचे प्रत्यारोपण (टिम्पॅॅनोप्लास्टी) केले जाते. या ऑपरेशनमध्ये कानामध्ये त्वचेचा कृत्रिम पडदा तयार करून बसविला जातो. काहीवेळा मायरिंगोटाॅॅमी केली जाते. यात पडद्यातून द्रव बाहेर काढला जातो. तसेच व्हेंटिलेशनट्यूब टाकण्यात येते.

 कानातून पाणी येऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी :- 

  • सर्दी, खोकला होणे, टाॅॅन्सिल्स, अॅॅडिनॉइडसच्या तक्रारी टाळण्यासाठी थंडगार पदार्थ खाणे टाळा. थंडगार एसीत बसू नका. 
  • आंघोळ करताना किंवा पोहताना पाणी कानात जाणार नाही याची काळजी घ्या. यासाठी छोट्याश्या पाॅॅलिथिन पिशवीने कान झाकावा. 
  • आंघोळीनंतर कान कोरड्या फडक्याने पुसा.      
  • कानात काडी, पेन्सिल यासारख्या वस्तू घालणे टाळा. 
  • वारंवार कान खाजवणे टाळा. 
  • मोठ्या आवाजापासून कानाला इजा होऊ नये यासाठी इअर प्लगचा वापर करा. 
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कानात कोणतेही औषध घालू नका. विनाकारण घरगुती उपाय करत बसू नका.
  • कानातून पाण्यासारखे स्त्रव येत असल्यास आणि कान दुखायला सुरुवात झाल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता कानाच्या डॉक्टरांकडे जावे. 
        



Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स