डोळ्यांची जळजळ, डोळ्यांतून पाणी येणे ह्यावर खात्रीशीर घरगुती उपाय


 

         सुंदर रेखीव डोळ्यांचे कौतुक प्रत्येकालाच असते. अशा सुंदर डोळ्यांची काळजी घेतल्यास हेच आयुष्य अधिक सुंदर दिसतंं. जेव्हा आपण कांदा कापतो तेव्हा डोळ्यांची जळजळ आणि डोळ्यातून पाणी येत, कारण कांद्यामध्ये अमीनो अॅॅसिड सल्फाॅॅक्साइड आणि सल्फेनिक अॅॅसिड नावाची रसायने असतात. जी एकत्रितपणे प्रोपेन्थिओल एस-ऑक्साइड तयार करतात. ज्यामुळे डोळ्यांतून पाणी येते आणि नाकातून पाणी येऊ लागते. परंतु कोणतेही इतर काम करत असताना, आपल्या डोळ्यांतून पाणी येत असेल, तर मग ते एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते. 

डोळ्यातून पाणी का येतंं ? 

          जेव्हा एखादी व्यक्ती काही बघण्यासाठी डोळ्यांना ताणत करते, त्या कारणामुळे त्याचे डोळे पाणावतात. ही समस्या त्या लोकांमध्ये अधिक आहे ज्यांचे डोळे अशक्त आहेत, म्हणजे ज्यांना दूरवरच्या आणि जवळच्या गोष्टी पाहण्यास त्रास होतो. अशा लोकांना अशा समस्या आहेत. डोळ्यातून सतत पाणी येण्यामागे पुष्कळ कारणे आहेत, ती जाणून घेऊया.

 

डोळ्यातून सतत पाणी येण्याची कारणे : 

  1. डोळ्यात धूर जाणे 
  2. कोरडे डोळे 
  3. सुजलेले डोळे 
  4. प्रदुषणामुळे डोळ्यातून पाणी येणे 
  5. काहीतरी जवळून पाहणे 
  6. डोळ्यात वारा जाणे 
  7. आता आपले डोळे आजारी असतील तर ही खालील लक्षणे तपासून बघा. 
  8. कमकुवत डोळे 
  9. दूर आणि जवळ दृष्टी कमी होणे 
  10. नेहमी लाल डोळे 
  11. खाज येणारे डोळे 
  12. डोळ्यात कायम घाण साठणे 
  13. उघड झाप करताना दुखणे 
          जर आपल्याला अशी लक्षणे दिसली तर आपण तात्काळ डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, काही असलं तरी, मानवी शरीरात डोळे खूप महत्त्वाची भमिका निभवतात.डोळ्यांशिवाय पूर्ण आयुष्य जगणे फार कठीण आहे. म्हणूनच, नेहमी आपल्या डोळ्यांची काळजी घ्या आणि काही समस्या असल्यास त्याकडे मुळीच दुर्लक्ष करू नका.
 

आजारी डोळ्यांच्या बाबतीत काय उपाय करावेत 

  • बर्फ लावा : 
जर तुमच्या डोळ्यांतून पाणी येत असेल तर तुम्ही डोळे कापडात बर्फ ठेऊन त्याने शेकवा. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल. 

  • संगणक, टीव्ही आणि मोबाईल टाळा : 
सतत संगणक, टीव्ही आणि फोन वापरल्यामुळे तुमचे डोळे खराब झाले आहेत, जेव्हा हे सारंं आवश्यक असेल तेव्हाच करा. जे लोक कम्प्यूटरवर काम करतात, त्यांनी त्यांच्या डोळ्यांवर थोड्या थोड्या वेळाने पाणी मारत राहिले पाहिजे. 

  • वेलची खा : 
तुम्हाला डोळ्यांचा त्रास असेल आणि तुम्ही वेलची खाल्ली तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. ह्या उपायाने डोळ्यांतून पाणी येणे बंद होईल. एक ग्लास दुधात दररोज दोन वेलची मिसळा आणि त्याचे सेवन केल्यास तुम्हाला डोळ्यांच्या त्रासातून मोकळीक मिळेल. 

लक्षात ठेवा 

           डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यांमध्ये कोणतेही औषध टाकू नका, यामुळे तुमच्या डोळ्यांना नुकसान होऊ शकते. हे चांगले आहे की आपण नियमितपणे आपले डोळे तपासून पहा. ह्याव्दारे, आपल्याला डोळ्यांचा रोग झाला असेल तर माहित होईल आणि आपल्या डोळ्यांचा योग्य वेळीच उपचार केला जाऊ शकतो. 

जर आपल्याला आपल्या डोळ्यांची काळजी घ्यायची असेल तर हंगामी फळे आणि भाज्या खा आणि दररोज हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या खा, ह्यामुळे आपले डोळे अशक्त होणार नाहीत. 


Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स