लघवीतून रक्त येण्याची कारणे व उपाय

 लघवीतून रक्त येणे :- काहीवेळा लघवीतून रक्त पडल्याचे दिसते. वैद्यकीय भाषेत याला हेमॅॅटुरीया असे म्हणतात. लघवीतून रक्त जाणे याची आणेल कारणे असू शकतात. काही कारणे ही सामान्य तर काही कारणे गंभीर सुद्धा असू शकतात. त्यामुळे लघवीतून रक्त येत असल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. 

लघवीतून रक्त येण्याची कारणे :- 

  • मूत्रमार्गात दुखापत झाल्याने लघवीतून रक्त येऊ शकते. 
  • तसेच मुतखडा, मूत्रमार्गातील इन्फेक्शन, किडनीचे आजार, पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी वाढणे अशा कारणांनी लघवीतून रक्त येऊ शकते. 
  • एस्पिरिन आणि पेनिसिलिन यांसारख्या औषधांमुळेही लघवीतून रक्त येऊ शकते. 
  • काहीवेळा किडनीचा कर्करोग, प्रोस्टेट कॅॅन्सर अशा गंभीर कारणांमुळे देखील लघवीतून रक्त येऊ शकते. 
लघवीतून रक्त पडणे याची लक्षणे :- लघवीतून रक्त जाणे हे याचे प्रमुख लक्षण असते. याशिवाय जर किडनी स्टोन मुले लघवीतून रक्त जात असेल तर यावेळी ओटीपोटात अतिशय वेदना होणे, पाठीत दुखणे, लघवी करताना दुखणे आणि मळमळ होणे अशी अन्य लक्षणे देखील असतात. 

लघवीतून रक्त येणे याचे निदान :- लघवीतून रक्त कशामुळे जात आहे टे तपासण्यासाठी युरीन टेस्ट केली जाते. याशिवाय सिस्टोस्कोपी, किडनी इमेजिंग तपासणी, अल्ट्रासाऊंड सारख्या तपासण्या देखील कराव्या लागू शकतात. 
डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक आहे..? 
लघवी करताना रक्त येत असल्यास, त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. कारण काहीवेळा लघवीतून रक्त पडणे हे इतर गंभीर समस्यांशी संबंधित असू शकते. यासाठी याचे वेळेवर निदान आणि उपचार होणे गरजेचे आहे. 
लघवीतून रक्त येणे यावरील उपचार :- 
  • कोणत्या कारणांमुळे लघवीतून रक्त जात आहे, त्या कारणांवर उपचार अवलंबून असतात. 
  • जसे जर मूत्रमार्गात इन्फेक्शन झाले असल्यास, त्यासाठी डॉक्टर अँँटीबायोटिक्स औषधे देतील. आणि जर मुतखडा असल्यास, त्यासाठी औषधे किंवा शस्त्रक्रिया याव्दारे उपचार केले जातात. 

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स