पाठदुखीने हैराण झाले आहात ? मग 'हे' ५ घरगुती उपाय करून बघाच!

 आजकालच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे आपल्या पैकी अनेक जण शारीरिक आणि मानसिक आजाराने हैराण आहेत. बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे पाठदुखीची समस्या आजकाल १० पैकी ८ लोकांमध्ये पाहायला मिळत आहे. यासर्वा साठी तुम्ही घरच्या घरी उपचार करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते उपाय. 

पाठदुखीचा त्रास आपल्याला जरी सामान्य वाटत असेल या दुखण्यामुळे आपले कोणत्याच गोष्टीत लक्ष लागत नाही. या समस्येकडे दुर्लक्षित केल्यास कालांतराने मोठी समस्या निर्माण होऊ शकते. या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी. 



तेलानं हळुवार मालिश करावी :- 

पाठदुखीचा त्रास कमी करण्यासाठी दररोजतेलाने मालिश करावी. यामुळे पाठदुखीचा त्रास कमी होईल. नारळ किंवा मोहरीच्या तेलात चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकून तेल चांगलं गरम करावं. नंतर तेल थंड झाल्यानंतर त्या तेलानं पाठीची हलक्या हातानं मालिश करावी. त्याच प्रमाणे तुम्ही बदामाच्या तेलाचा वापर देखील करू शकता. 

नियमितपणे योग करा :- 

भारतात योग या प्रकाराला जास्त महत्त्व देण्यात आले आहे. योगा योगा पद्धतीच्या मदतीने तुम्ही पाठदुखीवर उपाय करू शकता. यामध्ये त्रिकोणासन, भुजंगासन, मार्जरासन यांसारख्या सोप्या आसनांचा वापर तुम्ही करू शकता. त्यामुळे तुमची पाठदुखी कमी होण्यास मदत होईल. 

कॅॅल्शियमयुक्त आहार घ्या :-

हाडाच्या ठिसूळपणामुळे तुम्हाला पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आहारात साजूक तूप, दुध, उडीद, मासे अशा पदार्थांचे सेवन करू शकता. त्यामुळे शरीरातील कॅॅल्शियमची मात्रा वाढते. आणि दुखणे कमी होतो. 

मिठाच्या पाण्यानं अंघोळ करा. 

पाठदुखीच्या समस्येत स्नायूची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे स्नायू मोकळे करण्यासाठी मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास आराम मिळतो. मिठ्मुळे तुमच्या शरीरातील स्नायू मोकळे होण्यास मदत होईल. 

नियमित व्यायाम करणे :- 

सुदृढ व निरोगी आयुष्यासाठी व्यायाम उत्तम मानले जाते. नियमित व्यायाम केल्यास पाठदुखी या समस्यांवर मात करता येते. रोज पायी चालल्यामुळे तुम्हाला पाठदुखीच्या त्रासापासून मुक्तता मिळू शकते.   

 


Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स