कवीळ हा एक सामान्य आजार आहे. जो आजार लीवरशी जोडलेला आहे. युनानी चिकित्सीय पद्धतीमध्ये काविळीला यरकान असं म्हटल जातंं. ही एक अशी स्थिती आहे ज्यावेळी रक्तात मोठया प्रमाणात बिलीरुबीन बनते. बिलीरुबिन हे लाल रक्तपेशी पासून हिमोग्लोबिनच्या विघटनाने तयार झालेले संयुग आहे.
काविळ काय आहे ? या आजाराला कावीळ असे म्हणतात. करण रक्तातील बिलीरुबिनच्या अतिरेकीमुळे त्वचा, आणि डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसू लागतो. असे मानले जाते की, जेव्हा यकृतामध्ये काही दोष असतो आणि ते त्याचे कार्य योग्यरित्या करू शकत नाही. तेव्हा बिलीरुबिन वाढू लागते. त्यावेळी कावीळची लागण होते.
काविळीवर उपचार घेणे का गरजेचे ?
रक्तातील बिलीरुबिनची उच्च पातळी म्हणजेच गंभीर कावीळ यकृत निकामी होऊ शकते कारण बिलीरुबिन तयार होणे अत्यंत विषारी असते. रक्तातील बिलीरुबिनचे प्रमाण २mg/dl पर्यंत पोहोचू नये.
काविळीवर उपाय :
प्रत्येकाचा आपला स्वतःचा एक सामान्य स्वभाव असतो. काविळीसह यकृताचे आजार गुणवत्तेमध्ये आणि प्रमाणातील अडथळ्यामुळे होतात. नॅॅशनल हेल्थ पोर्टल ऑफ इंडिया नुसार. काही युनानी औषधांसह काही सोप्या घरगुती उपचारांमुळे कावीळ बरी होण्यास मदत होऊ शकते.
काविळीच्या आजारावर घरगुती उपाय म्हणून एक ग्लास टोमॅॅटोमध्ये मीठ आणि काळीमिरी पावडर टाकून प्यायल्याने कावीळ कमी होते. हे मिश्रण सकाळी उपाशी पोटी घ्यावं. काविळीवर हा अतिशय असरदार असा घरगुती उपाय आहे. काविळीवर दुसरा सर्वोत्तम घरगुती उपाय म्हणजे मुळ्याची पाने. मुळ्याच्या पानांचा रस काढून घ्यावा. हा रस जवळपास दिवसभरात अर्धालीटर संपवावा, अवघ्या १० दिवसांत काविळीची लागण झालेल्या रुग्णाला बरे वाटू शकते. पपईची पाने हा तिसरा महत्त्वाचा उपाय काविळीवर रामबाण ठरतो. पपईच्या पानांची एक चमचा पेस्ट करून घ्या, या मिश्रणात एक चमचा हळद घाला. दररोज एक ते दोन आठवडे हे मिश्रण घ्यावे, काविळीवर हा रामबाण उपाय ठरू शकतो. हा घरगुती उपाय अतिशय सहज करता येण्याजोगा आहे.
ऊस योग्य पचन आणि यकृताचे चांगले कार्य करण्यास मदत करते. ज्यामुळे रुग्णाला काविळपासून लवकर बरे होण्यास मदत होते, एक ग्लास उसाचा रस घ्या आणि त्यात थोडा लिंबाचा रस घाला. उसाचा रस काढण्यापूर्वी उस पूर्ण स्वच्छ करून घ्यावा. ताज्या उसाच्या रसाचे फायदे होतात. तुळस ही कायम घरगुती उपाय म्हणून लोकप्रिय आहे. प्रत्येक आजारावर तुळस अतिशय फायदेशीर आहे. १० ते १५ तुळशीच्या पानांची पेस्ट करून घ्या, अर्धा ग्लास ताज्या मुळ्याचे रस काढून घ्या त्यामध्ये तुळशीची पेस्ट टाका. हे मिश्रण तीन आठवडे घ्या तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. आवळा हा व्हिटॅमिन सी चा चांगला स्त्रोत आहे आणि येरकन कावीळची लक्षणे कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. यासाठी तुम्ही रोज सकाळी आवळ्याचा रस घेऊ शकता किंवा काळे मीठ घालून चावू शकता. एक कप बर्लीचे पाणी सुमारे तीन लिटर पाण्यात उकळवा आणि सुमारे तीन तास उकळू द्या. कावीळपासून लवकर बरे होण्यासाठी दिवसभरात शक्य तितक्या वेळा पाणी घ्या.
Comments
Post a Comment