अंगदुखी वर घरगुती उपाय


 अंगदुखी वर घरगुती उपाय :- आज आपण या लेखांमध्ये अंग दुखी या वर वेगवेगळे उपाय पाहणार आहोत. सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये लोकांचे आपल्या तब्येत्तीकडे आणि आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. आणि आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे लोकांच्या काही ना काही आरोग्य समस्या ह्या उद्भवत आहेत आणि त्यामधील ही एक आरोग्य समस्या म्हणजे अंग दुखी होय. सध्या असे अनेक लोक आहेत ज्यांना अंग दुखीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे आणि या समस्येमुळे त्यांची तब्येत आणखीन बिघडत आहे आणि त्यांना रोज ह्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी व्यक्तीचा नियमित व्यायाम हा खूप गरजेचा असतो. चला तर आता आपण अंग दुखी वर कोणकोणते घरगुती उपाय करता येतात, ते पाहूया. 

अंगदुखी वर घरगुती उपाय :- अंगदुखी ही शरीराला व्यायामाची कमतरता झाल्यामुळे देखील होऊ शकते त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचे वजन वाढल्यामुळे देखील अंगदुखी होऊ शकते आणि अंग दुखीला अशी अनेक करणे आहेत ज्यामुळे अंग दुखते. अंग दुखी ही काही वेळा गंभीर समस्या नसते पण काही वेळा अंग दुखी म्हणजे गंभीर समस्या मानली जाते. अंग दुखीमध्ये हात, पाय, मान, पाठ, गुडघे, खांदे यांसारख्या शरीराच्या अवयवांमध्ये वेदना असतात.
 

आले :- 

अंगदुखी दूर करण्यासाठी आले खूप फायदेशीर आहे. कारण यामध्ये एंनटीइफ्लेमेटरी व फायटोकेमिकल्स असे घटक असतात. अंगदुखीवर एक कप पाण्यात चमचा भर मध आणि थोडे आले हे मिश्रण उकळवावे. मिश्रण उकळल्यानंतर ते गाळून घेऊन प्यावे. यामुळे अंगदुखी कमी होण्यास मदत होते. 



दालचिनी :- 

दालचीनितील एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे अंगदुखीपासून त्वरित आराम मिळण्यास मदत होते. यासाठी १ ग्लास कोमट पाण्यात १ चमचा दालचिनी मिसळून ते मिश्रण प्यावे.  

 



हळद :- 

हळदीमध्ये सूज व वेदना कमी करणारे औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे अंगदुखीमध्ये गरम दुधात १ चमचा हळद मिसळून ते प्यावे. अंगदुखी असल्यास हा उपाय उपयुक्त ठरतो.    


Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स