पोटात कळ येणे याची कारणे व उपाय
पोटात कळ आल्यावर पोटा अतिशय वेदना होऊ लागतात. अनेक कारणांनी पोटात कळ येते. प्रामुख्याने अपचनामुळे हा त्रास होत असतो. याशिवाय पोटात बॅॅक्टेरिअल, व्हायरल किंवा कृमींचे इन्फेक्शन झाल्यानेसुद्धा पोटात कळ येते. पोटात कळ येणे याची कारणे वूपाय याविषयी माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी दिली आहे.
पोटात कळ मारणे याची करणे :-
- घेतलेला आहार न पोहोचल्याने अपचन होऊन पोटात कळ मारून येते.
- पचनास जड असणारे पदार्थ, तेलकट मसालेदार पदार्थ भरपेट खाण्यामुळे अपचन झाल्याने.
- अन्नातून विषबाधा झाल्यानेही पोटात कळ मारून येते.
- दुधाचे पदार्थ पचन नसल्यास Lactose Intolerance मुळे.
- ग्लूटेन युक्त असणारे पचत नसल्यास त्यामुळेही पोटात कळ मारून येते.
- पचनसंस्थेत बॅॅक्टेरिया, कृमी किंवा व्हायरसचे इन्फेक्शन झाल्यामुळे पोटात कळ येते.
- जुलाब,अतिसार, गॅॅस्ट्रो, टायफाईड, उलट्या, ह्यांसारख्या आजारांमुळे पोटात कळ येते.
- अपेंडिक्सला सूज आल्यामुळे पोटात कळ येऊ शकते.
- मानसिक तणाव किंवा भीतीमुळे.
- काही विशिष्ट औषधांच्या परिणामामुळे पोटात कळ मारून येऊ शकते.
- स्त्रियांमध्ये मासिक पाळी, गरोदरपणा यामुळे पोटात कळ येते.
पोटात नेमकी कशामुळे कळ मारून येत आहे त्या कारणांनुसार यावरील उपचार ठरतात. जसे बॅॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्याने पोटात कळ येत असल्यास त्यावेळी डॉक्टर, अॅॅन्टीबयोटीक औषधे देतील. तसेच पोटातील कळ कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधे दिली जातील.
पोटात कळ येणे यावर घरगुती उपाय :-
- पोटात कळ येत असल्यास अर्धा कप पाण्यात लिंबू रस व काळे मीठ घालून ते मिश्रण प्यावे.
- गरम पाण्यात अर्धा चमचा ओवा मिसळून टे पाणी प्यावे. यामुळे पोटात कळ येणे थांबते.
- पोटात कळ येत असल्यास गरम पाण्यात चिमुटभर हिंग व सैंधव मीठ घालून टे पाणी प्यावे.
- पोटात कळ येत असल्यास आल्याचे तुकडे पाण्यात घालून टे पाणी उकळावे मिश्रण कोमट झाल्यावर टे पाणी अर्धा कप प्यावे.
- पोटात कळ येत असल्यास पोटावर गरम शेक घ्यावा. हे घरगुती उपाय पोटात कळ मारणे यावर फायदेशीर ठरतात.

Comments
Post a Comment