तुम्ही नियमित लिंबूचे सेवन करता का? जाणून घ्या ही माहिती


              आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टर काही जणांना लिंबू पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करण्याचा सल्ला देतात. प्रत्येकाच्या आरोग्याच्या गरजांनुसार डॉक्टरांकडून आहारामध्ये कोणते बदल करावेत, याबाबत मार्गदर्शन दिले जाते. दिवसाची सुरुवात लिंबूच्या सेवनाने केल्यास काय होते, जाणून घेऊया माहिती. आहारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लिंबूचा समावेश केला जातो. आकाराने छोट्या असलेल्या लिंबूमध्ये औषधी गुणधर्मांचा साठा आहे. लिंबूचे सेवन केल्यानं आपल्याला कित्येक आरोग्यदायी लाभ मिळू शकतात. नैसर्गिक स्वरुपात शरीर डिटाॅॅक्स करण्यासाठी तज्ज्ञमंडळी लिंबू पाणी पिण्याचा सल्ला देतात. बहुतांश जणांना वेगवेगळ्या स्वरुपात लिंबू खाणंं पसंत असते. लिंबूमुळे कोशिंबीर, खिचडी इत्यादी पाककृतीची चव वाढवण्यास मदत मिळते.
 


            आरोग्याबाबत सांगायचे झाले तर पोटाशी संबधित समस्या उद्भवल्यानंतर नैसर्गिक उपाय म्हणून काळे मीठ, जिरे पावडर आणि लिंबू रस मिक्स करून चाटण तयार करून दिल जातं. आरोग्यासाठी पोषक असणाऱ्या घटकांचा लिंबूमध्ये समावेश आहे. लिंबू रस मिक्स करून चाटण तयार करून दिल जात. आरोग्यासाठी पोषक असणाऱ्या घटकांचा लिंबूमध्ये समावेश आहे. जाणून घेऊया याबाबतची माहिती. 

पचन संस्थेचे कार्य :- 









            आपल्यापैकी बहुतांश जण पचनाशी संबंधित समस्येमुळे त्रस्त असतात. पण जी लोक नियमित कोमट पाण्यातून लिंबाच्या रसाचे सेवन करतात, त्यांना अशा समस्यांचा सामना करावा लागत नाही. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन लिंबू पाणी पिऊन तुम्ही आपल्या दिवसाची सुरुवात करू शकता. या पेयामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जाण्यास मदत मिळते. तुम्हाला केवळ लिंबू पाणी पिण्यास त्रास होत असल्यास त्यामध्ये चवीनुसार मीठ मिक्स करू शकता. यामुळे पेयाची चव देखील वाढेल आणि तुमची पचन प्रक्रिया देखील सुरळीत सुरु राहण्यास मदत मिळेल. 

सर्दी-खोकल्यापासून होऊ शकतो बचाव :- 









कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून प्यायल्यास तुम्हाला आरोग्यदायी लाभ मिळू शकतात. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नियमित स्वरुपात हे पेय प्यायल्यास सर्दी, खोकलायासारख्या आजारापासून संरक्षण होण्यास मदत मिळेल. 


तोंड कोरडे होण्याची समस्या :- 








शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास तोंड वारंवर कोरडे होण्याची समस्या उद्भवते. यामुळे सतत तहान लागणे आणि लघवीला होणे, यासारख्या त्रासाचाही सामना करावा लागतो. या समस्यांवर नैसर्गिक उपाय म्हणजे लिंबू, डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही फळे, भाज्या इत्यादी खाद्यपदार्थांमध्ये लिंबू पिळून त्याचे सेवन करू शकता. आहारतज्ज्ञांनी सांगितल्यानंतरच सकाळच्या सुमारास लिंबू पाणी प्यावे. यामुळे  डिहायड्रेशन आणि तोंड कोरडे होण्याची समस्या दूर होण्यास मदत मिळेल. 

निरोगी आरोग्यासाठी :- 










वेळी अवेळी खाणेपिणे, बदलती जीवनशैली, अपुरी झोप इत्यादी कारणांमुळे काही जणांच्या शरीरातील अनावश्यक घटक, अतिरिक्त चरबी आणि विषारी पदार्थ शरीराबाहेर फेकले जाण्यास अडथला निर्माण होतो. यामुळे अन्य आजारांना आयते निमंत्रण मिळण्याची शक्यता असते. या समस्या टाळण्यासाठी आपल्या आहारामध्ये लिंबू किंवा लिंबू पाण्याचा समावेश करावा. 

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स