शरीराच्या गरजेनुसार भरपूर पाणी प्या आणि ब्लड प्रेशरपासून दूर रहा.
डिहायड्रेशन सातत्याने होत असेल तर मात्र हे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असते. आपल्या शरीराचा महत्त्वाचा पार्ट असलेले हृद्यही जवळपास ७० टक्के पाण्याने व्यापलेले बनलेले असते.
Health Tips :- आपण आपल्या आजूबाजूला पाहतो की, एखाद्या व्यक्तीला हायब्लड प्रेशरचा त्रास असेल तर काही पथ्य पाळावी लागतात. हायब्लड प्रेश्र्च्या व्यक्तीला मीठ आणि सोडापाणी यांचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. कारण मीठ आणि सोडापाणी पिण्यामुळे शरीरातील ब्लड प्रेशरच प्रमाण वाढते. त्यामुळे कमी ब्लड प्रेशरचा त्रास असणार्या व्यक्तीला मीठ आणि लिंबू पाणी किंवा सोडापाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण शरीरातील पाण्याचे योग्य संतुलन राहते. त्यामुळे पाणी आणि हायब्लड प्रेशरचा याचा कसा संबंध हे आपण जाणून घ्यायला हवे. हे जर समजून घेतलात तर तुम्ही या आजारापासून लाईफ टाईम दूर राहू शकाल.
खरेच पाण्याचा आणि हायब्लड प्रेशरचा काही संबंध आहे का?
मानवी शरीरात जवळपास निम्म्यापेक्षा जास्त पाणी असते. त्यामुळे आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांतील रक्ताचे नीट वहन होण्यास मदत मिळते. अन्यथा, शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे शरीर डिहायड्रेट होते. त्यामुळे आपल्या शरीराचा महत्त्वाचा पार्ट असलेले हृद्यही जवळपास ७० टक्के पाण्याने व्यापलेले बनलेले असते. कामाच्या व्यापामुळे म्हणा किंवा इतर काही कारणामुळे तुम्ही जर वेळेत पाणी पिणे टाळत असाल तर ब्लड प्रेशरचा आजार वाढू शकतो. कारण पाण्याच्या कमतरतेमुळे शरीराला आवश्यक घटक मिळत नाहीत. कारण पाण्यात शरीराला लागणारे क्षार असतात. त्यामुळे पाण्याचा आणि हायब्लड प्रेशरचा खूप जवळचा संबंध असून शरीरातील पाण्याचे योग्य संतुलन राखण्यासाठी काळजी घ्यायला हवी.
डिहायड्रेशनमुळे आरोग्यावर होणारा परिणाम :-
आपल्यातील बहुतेकांना माहिती आहे की, दररोज सरासरी चार ते पाच लिटर पाणी प्यायला हवे. तर, तुमचे शरीर डिहायड्रेट होण्यापासून सुरक्षित राहू शकते. डिहायड्रेशन मुळे लवकर थकवा जाणवतो. जर शरीरातील पाण्याचे योग्य संतुलन राखता आले नाही तर शरीरातील सोडियमची पातळी वाढते. तसेच हायबिपिचा आजार असणाऱ्यांच्या शरीरात आधीच सोडीयमचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे त्यांना गोड किंवा लिंबू पाणी याचे सरबत दिले जात नाही. पण कोणत्याही ऋतूत आपल्या शरीराची गरज ओळखून सरबत, पाणी आणि मीठ योग्य प्रमाण भरपूर असते. त्यामुळे गोड किंवा लिंबू पाणी दिले जात नाही. तसेच बऱ्याच संभाव्य आजारांपासून दूर राहू शकतो.
भरपूर पाणी प्यायल्यामुळे खरचं आजार दूर होतात का?
तुम्हाला कधी ना कधी भरपूर प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला गेला असेल. या मागील हेतू चांगला असला तरी हे तितके खरे नाही. कारण ऋतुमानानुसार शरीराला आवश्यक तितकेच पाणी लागते. याचे योग्य संतुलन राखायला हवे. त्यामुळे भरपूर पाणी पिल्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास कमी होतो, असे ठोस कारण सांगता येऊ शकत नाही. त्यामुळे आपले शरीर डिहायड्रेशनपासून दूर राहण्यासाठी वेळेत पाणी प्यायला पाहिजे. हे वर्षाचे बारा महिने पथ्य पाळली तर दीर्घकाळासाठी नक्कीच फायदा मिळतो.
Disclalmer :- या लेखातील माहिती ही केवळ सर्वसामान्यांच्या जागरूकतेसाठी प्रकाशित केलेली आहे. यापैकी कोणताही मजकूर हा वैद्यकीय सल्ला नाही. आपल्या शंका किंवा प्रश्नांसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Comments
Post a Comment