गर्मीत तेलकट त्वचेची निगा राखण्याचे उपाय

तेलकट त्वचेच्या लोकांना हिवाळ्यात कोणत्याच अडचणी येत नाही परंतु उन्हाळ्यात त्यांना चेहऱ्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. खाली असे काही उपाय नमूद केले आहेत ज्यामुळे गर्मीत आपण तेलकट त्वचेची निगा राखून चेहऱ्याच्या अनेक समस्यांवर मात करू शकतो व चेहऱ्याची चांगली काळजी घेऊ शकतो. 


कोमट पाण्याने चेहरा धुणे :-  

तेलकट त्वचा असल्यास कोमट पाण्याने चेहरा साफ करावा कारण कोमट पाण्यात चेहऱ्यावरील तेल प्रभावीपणे मिसळते कोमट पाण्याच्या वापराने त्वचेवरची घाण आणि अशुद्ध द्रव्ये स्वच्छ होतात व चेहऱ्यावरील छिद्रे मोकळी होतात. 





सूर्यकिरणांपासून सावधानता :- 

गर्मीत तेलकट त्वचेच्या लोकांचा पहिला शत्रू म्हणजे सूर्य. अधिक काळ घराबाहेर राहिल्यास सूर्यकिरणांमुळे चेहऱ्यावरील तेलाचे प्रमाण वाढते. UV किरणांमुळे चेहऱ्यावर वाईट परिणाम होतात. सकाळी १० ते संध्याकाळी ३ पर्यंत सूर्यकिरणे तेज व हानिकारक असतात. या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे. 




ग्लोइंग त्वचेसाठी काय करावे

चेहऱ्याची अतिरिक्त स्वच्छता टाळावी. 

तेलकट त्वचेच्या लोकांनी आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात चेहरा धुण्याची सावधानता बाळगावी. सारखा चेहरा धुतल्याने अतिरिक्त तेलाची समस्या आणखी प्रबळ होते. चेहऱ्यावर अशा सौम्य क्लीनजरचा वापर करावा जो त्वचेला कोरड न बनवता मऊ व निरोगी ठेवतो. 



सकस आहार :-  

आपण जे काही जेवतो त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. गर्मीत सकस आहाराकडे वळण्याची चांगली संधी असते कारण आपल्याला भूक कमी लागते. उन्हाळ्यात तेलकट पदार्थ टाळावेत. हिरवी पालेभाजी, फळ यांचा आहारामध्ये समावेश असल्यास चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होते. 





आठवड्यातून दोन वेळा फेस पॅॅक चा वापर :-   

त्वचेच्या चिकटपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा फेस पॅॅक चा प्रयोग करावा. आज बाजारात विविध समस्यांसाठी उदा. मुरूम, काळे डाग, मोठी छिद्र, सफेद डाग यासाठी अनेक प्रकारचे फेस पॅॅक उपलब्ध आहेत. आपल्या आवश्यकतेप्रमाणे आपण फेस पॅॅक निवडून वापरावा. 





जास्त पाणी पिणे 


चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करण्यासाठी एक उपाय म्हणजे आपल्या शरीरातील पाणी जास्त पाणी पिणे कधीच कमी पडू देऊ नये. साखरयुक्त पेय टाळावीत व दिवसातून जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करावा. बाहरे पडताना आपल्यासोबत पाण्याची बॉटल ठेवावी आणि गरज भासल्यास पाणी प्यावे. 





Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स