घशातील दुखणे दूर करण्यासाठी फायदेशीर घरगुती उपाय


हल्ली कोणताही संसर्ग झाला की, थोडी भीतीच वाटते. त्यातच वातावरणात बदल झाला की, काही त्रास हे अगदी होतातच. त्यातीलच एक त्रास म्हणजे घसा दुखणे. काही वेळा अचानक आपला घसा दुखणे चा त्रास होऊ लागतो. घसा दुखण्याचा त्रास तुम्हला होऊ लागला तर घरगुती उपाय तुम्हाला माहित असायला हवे.

घसा  दुखणे घरगुती उपाय : 

  • हळद : 
हळद संसर्गाचा सामना करण्यास मदत करते. घसा दुखत असेल तर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ एक कप कोमट पाण्यात मिसळून सेवन करा.
 

  • मध : 
घसादुखीपासून आराम मिळण्यासाठी कोमट पाण्यात मध आणि थोडासा लिंबाचा रस मिसळून सेवन करा. मधामध्ये अँँटीबॅॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे घसादुखीपासून आराम मिळतो. 

  • मीठ : 
कोरडा खोकला आणि घसादुखीवर उपचार करण्यासठी आपण शतकानूशतके मीठ आणि पाणी वापरत आहोत. एक कप कोमट पाण्यात एक चमचा मीठ विरघळून गुळण्या करा. 

  • अॅॅपल सायडर व्हीनेगर : 
अॅपल सायडर व्हिनेगर यात घशातील बॅॅक्टेरिया मारण्याची क्षमता असते. हे घशातील संक्रमण आणि सर्दीच्या लक्षणांपासून मुक्त होण्यास देखील मदत करू शकते. एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा अॅॅपल सायडर व्हिनेगर मिसळा आणि दिवसातून एकदा ते प्या.
 

  • लसूण :
कच्चा लसणात जंतुनाशक गुणधर्म असतात. घसा खवखवण्याच्या वेदना कमी करण्यास मदत करू शकते. कच्चा लसूण ठेचला की ते ऍलिसिन सोडते. ज्यामध्ये अँँटी-बॅॅक्टेरियल, अँँटीफंगल आणि अँँटीवायरल गुणधर्म असतात. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स