पोषण आणि आरोग्य
- Get link
- X
- Other Apps
पोषण आणि आरोग्य
वाढ आणि विकास
वाढ आणि विकास सर्वसामान्य तऱ्हेने होण्यासाठी सुयोग्य पोषण आवश्यक असते. कुपोषणामुळे केवळ शारीरिक वाढ व विकास नव्हे त व्यक्तिच्या बौद्धिक क्षमतेवर तसेच आकलन शक्ती व वर्तनावर विपरीत परिणाम होतात. गरोदरपणात स्त्रीचे कुपोषण झाल्यास गर्भावर त्याचे वाईट परिणाम होतात. जसे की, मृत अपत्याचा जन्म, अपुऱ्या दिवसाचे मूल, पूर्ण दिवसाचे पण अपुऱ्या वाढीचे मुल इ. बालपणीच्या पूर्वार्धात कुपोषणामुळे शारीरिक व मानसिक वाढ मंद होते. अशी बालके माईल स्टोन (मैलांचे दगड) फार हळुहळु वाढतात. माईल स्टोन म्हणजे – ठराविक कालावधीत बालकांच्या शारीरिक व मानसिक वाढ व विकासाने गाठलेल्या टप्पा अशी मुले शाळेतल्या अभ्यासातही मागे पडतात. प्रौढामध्ये देखिल सुयोग्य आरोग्य आणि कार्यक्षमता टिकवण्यासाठी चांगल्या पोषणाची आवश्यकता असते. थोडक्यात आपणास असे म्हणता येईल की, पोषणाचे बरे वाईट परिणाम माणसाच्या आयुष्यावर जन्मापासून मृत्यू पर्यंत होत असतात.
सकस अन्न न खाल्ल्यामुळे होणारे आजार
उत्तम वाढीसाठी, भरपूर श्रम येण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी चांगल्या व सकस अन्नाची गरज असते. नेहमी आढळून येणाऱ्या बऱ्याचश्या आजारांमध्ये अपुरा व निकस आहार हेच कारण असते.
मृत्यू प्रमाण आणि आजाराचे प्रमाण –
कुपोषणाच्या प्रत्यक्ष परिणामापेक्षा त्याचे समाजातील अप्रत्यक्ष परिणामच जास्त धोकादायक ठरतात. उदा. जास्तीचा सामान्य मृत्यू दर (General Death Rate), जास्तीचा बालमृत्यू दर (IMR), जास्तीचा अनायोग्य दर (Sickness Rate) आणि कमी झालेली आयुर्मर्यादेची संभावना (Expectation of Iise). कुपोषणाचा एक प्रकार म्हणजे अतिपोषण (Over Nutrition) अतिपोषाणामुळे होणारे आजार म्हणजे स्थूलत्व व लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब (Hypertension), रक्तभिसरण संस्था तसेच किडनीचे आजार, लिव्हर आणि काही विशिष्ट प्रकारच्या ८९ पचनसंस्था कर्करोगास कारणीभूत असतात. आहार आणि काही आजार यांचा घनिष्ठ संबंध असतो.
विशिष्ट कमतरता (Specific Deficiency)
विशिष्ट पोषणविषयक कमतरतेच्या आजारांना कुपोषण प्रत्यक्षरित्या जबाबदार असते. आपल्याकडे आढळणारे सर्व साधारण हे आजार म्हणजे झुरणी रोग (Kwashirokor क्वाशियोरकोर), सुखा रोग (Marasmus मारास्मस), जीवनसत्व अ च्या अभावामुळे येणारे अंधत्व, रक्तक्षय (Anaemiya अनिमिया), बेरीबेरी (Beriberi) प्रतिबंधासाठी आणि आरोग्याच्या वाढीसाठी चांगल्या प्रकारचे पोषण अत्यावश्यक ठरते.
जंतुसंसर्गास प्रतिकार
कुपोषणामुळे क्षयरोगासारखा जंतुसंसर्ग फार चटकन होतो अनेक रोगाच्या तीव्रतेवर तसेच परिणामांवर कुपोषणामुळे वाईट प्रभाव पडतो तसेच जंतुसंसर्गाचा परिणाम व्यक्तीची भूक तसेच अन्नाचे पचन व शोषण यावर होतो.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment