Posts

मासिक पाळीतील वेदना दूर करण्यासाठी घरगुती उपाय

Image
मासिक पाळीतील वेदना दूर करण्यासाठी घरगुती उपाय (How To Reduce Menstrual Pain In Marathi) मासिक पाळी ही महिलांमधील एक नैसर्गिक शारीरिक क्रिया आहे. मात्र बऱ्याचदा अचानक घरी आलेल्या पाहुण्यांप्रमाणे मासिक पाळी देखील कोणत्याही क्षणी येते. दर महिन्याला महिलांना मासिक पाळीला सामोरं जावंच लागतं. काही महिलांमध्ये मासिक पाळीचा फ्लो हा साधारणपणे तीन-चार दिवस असतो. तर काही महिलांना अगदी पाच ते सात दिवस मासिक पाळी येते. प्रत्येक महिलांची शारीरिक रचना, आहार, जीवनशैली निरनिराळी असल्याने मासिक पाळीचा त्रासदेखील प्रत्येकीचा वेगवेगळा असू शकतो. मासिक पाळीत काहीच्या पोटात वेदना होतात. तर काहींची कंबर या दिवसांमध्ये खूप दुखते. कोणाच्या छातीमध्ये जडपणा येतो तर कुण्याच्या पायाच्या पोटऱ्या दुखतात. काही जणींना मासिक पाळी येण्याआधी काही दिवस डोकेदुखीचा त्रास होतो तर काहींना मासिक पाळी सुरू असताना पोटात असह्य वेदना होतात. थोडक्यात प्रत्येक महिलेला मासिक पाळी सुरू असताना वेदना, क्रॅम्प सहन करावेच लागतात. शिक्षण अथवा कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांसाठी हा त्रास सहन करणं फारच कठीण असतं. फार कमी ...

उच्च रक्तदाबासाठी घरगुती उपचार

उच्च रक्तदाबासाठी घरगुती उपचार उच्च रक्तदाबात चक्कर येतात, डोकं घर घर फिरायला लागतं, कुठल्याही कामात मन लागत नाही. त्याच्यात शारीरिक श्रम करण्याची क्षमता नसल्या सारखी होते. रोग्याला झोप येत नाही. या आजाराचा घरगुती इलाजसुद्धा शक्य आहे, पण त्यासाठी संयम बाळगणे जरूरी आहे. * तीन ग्रॅम मेथीदाणा पूड सकाळ-सायंकाळ पाण्यासोबत घ्यावी. 15 दिवस बीन नागा करून ही पूड घ्यावी याने नक्कीच आराम पडतो. ही पूड मधुमेहीच्या रोग्यांसाठीपण फायदेशीर आहे. * कणीक व बेसन सम मात्रेत घेऊन त्याच्या पोळ्या तयार करून त्या खूप चावून चावून खाल्लयाने 10 दिवसातच उच्च रक्तदाबात आराम मिळतो. * टरबुजाच्या बियांची गिरी आणि खसखस सम मात्रेत घेऊन वेग वेगळे वाटून एका बरणीत भरून ठेवावे. उपाशी पोटी रोज एक चमचा हे घ्यावे. * जेवणानंतर नेमाने रोज ताक घ्यावे. * उच्च रक्तदाबाच्या रोग्यांसाठी पपीता फायदेशीर ठरतो, म्हणून रोज त्याचे सेवन केले पाहिजे. * 5 तुळशीचे पानं आणि 2 कडू लिंबाच्या पानांना वाटून 20 ग्रॅम पाण्यात घालून उपाशी पोटी हे पाणी प्यावे. * गार पाण्याने अंघोळ करण्याऐवजी कोमट पाण्याने अंघोळ क...

भाजल्यानंतर ही काळजी

Image
गरम पाणी पडल्याने किंवा पेटल्याने वा गरम भांड्याला हात लागल्याने आपण भाजले जातो. भाजल्यामुळे जखमही होतात. कधी हे भाजणं साध असतं तर कधी गंभीर रूप धारण करतं. जखम तीव्र, मध्यम किंवा तीव्र रक्तस्त्रावी असते. म्हणून भाजल्यानंतर ही काळजी घ्या: * जखमेवर बर्फ लावण्याऐवजी भाजल्याबरोबर त्यावर पाण्याची धार सोडा. हे शक्य नसल्यास एका भांड्यात थंड पाणी घेऊन त्यात  जखमी भाग  बुडवून ठेवा. * तूप, तेल, टूथपेस्ट किंवा कोणताही तरल पदार्थ जखमेवर लावू नये. त्याऐवजी एखादं अॅटीबायोटिक क्रीम लावावं. * भाजलेल्या भागाला कापूस किंवा कापडाने झाकू नये. * जखमेवरील फोड फोडू नये. * जखमेत जंतूसंसर्ग झाला असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. काही घरगुती उपाय * कोरफडीच्या गरामध्ये जखम बरी करण्याचे गुणधर्म असतात. जखमेमुळे त्वचेचा दाह होत असेल तर हा गर त्यावर लावावा. * फ्रीजमध्ये ठेवलेली टी बॅग काही काळ जखमेवर दाबून धरा. याने वेदना आणि दाह कमी होईल. गरमऐवजी गार पाण्याने अंघोळ करा. * व्हिनेगर आणि पाण्याचा मिश्रणात कापूस किंवा कापड बुडवून त्याला जखमेवर काही काळ दाबून ठेवा. ...

पोट दुखीचा त्रास कमी करण्याचे काही घरगुती उपाय खाली दिले आहेत -

पोट दुखीचा त्रास कमी करण्याचे काही घरगुती उपाय खाली दिले आहेत - दहा ग्रॅम गुळ व अर्धा चमचा खायचा चुना एकत्र करून त्याची एक गोळी तयार करावी. ही गोळी एक ग्लास कोमट पाण्यासोबत घेऊन थोडी झोप घ्यावी. थोड्याच वेळेत पोटदुखीवर आराम पडेल. जर पोट फारच जोराने दुखत असेल तर आल्याच्या रसामध्ये मध मिसळून त्याचे सेवन करावे. असे केल्याने पोट दुखणे थांबते. अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ एकत्र करून थंड पाण्यासोबत घेतल्याने पोट दुखणे थांबण्यास मदत होते. अर्धा चमचा आल्याचा रस व अर्धा चमचा लिंबाच्या रसामध्ये थोडेसे पादरे मीठ टाकून प्यायल्याने पोट दुखी थांबते. बिना दूधाचा चहा (कोरा चहा) प्यायल्यानेदेखील पोट दुखणे थांबते. त्यात थोडा लिंबाचा रस टाकल्यास लवकर असर होतो. एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा एकत्र करून प्यायल्याने पोट दुखी लगेच थांबते चांगल्या प्रकारे शिजलेले तांदूळ एका कॉटनच्या कपड्यात बांधून शेकल्यास पोट दुखी थांबते. एक ग्लास पाण्यामध्ये थोडासा गोड सोडा टाकून प्यायल्याने पोट दुखणे थांबते. सुंठ, जीरा आणि काळी मिरी सम प्रमाणात घेवून त्याचे चूर्ण बन...

किडनी स्टोन म्हणजे काय?

किडनी स्टोन म्हणजे काय? लक्षणे तपासणी किडनीमध्ये इन्फेक्शन किडनी स्टोन आणि होमिओपॅथी आजार व औषधोपचार किडनी स्टोन म्हणजे मूतखडा, हिंदीत पथरी तर वैद्यकीय भाषेत यास युरीनरी कॅल्कुलस अथवा रिनल कॅल्कुलस किवा नेफ्रोलिथीयासीस असे संबोधतो. किडनी स्टोन म्हणजे स्पटीकयुक्त कण की जे मुत्रातील कॅल्शियम ऑक्झिलेट, युरीक अॅसिड, ऑक्झॅलीक अॅसिडचे प्रमाण अधिक झाल्यास किडनीत तयार होतात व पर्यायाने मूत्रमार्गात अडथळा येतो. लक्षणे किडनीच्या भागात सूज, सूत्रता, दाब, ताठरता असणे, पोटात व कमरेखालील भागात टोचल्यासारख्या कापल्यागत तीव्र वेदना असणे, मूत्रमार्गात तसेच मूत्राशयात आग होणे, लघवीला जळजळ होणे. प्राथमिक अवस्थेत पोटात खूप त्रास व लघवीमध्ये रक्त तसेच जेलीयुक्त घटक पडतात. गंभीर अवस्थेत गडद रंगाची, गढूळ व मंदप्रवाही लघवी असते. तपासणी एखाद्या आजाराचे निदान कळण्यासाठी तपासण्या गरजेच्या असतात. आर.एफ.टी. ही तपासणी किडनीची कार्यक्षमता पाहण्यासाठी रक्ताद्वारे केली जाते. मूत्रातील जंतुसंसर्ग बघण्यासाठी लघवीची तपासणी केली जाते. किडनी स्टोनचा आकार, स्थान तसेच किडनीच्या रचनेतील बदल पाहाण्या...

कावीळ

कावीळ कारणे लक्षणे उपचार पशूंतील कावीळ                                                                                                                                                                                                                                                                                 ...

हार्टअटॅक टाळण्यासाठी उपाय.

हार्टअटॅक टाळण्यासाठी उपाय. हार्ट अटॅक टाळण्यासाठी काय करावे ? स्निग्धाहार योग्य व्यायाम घेणे तंबाखूचे सेवन टाळणे अतिमद्यपान टाळावे मानसिक ताण कमी करणे मधुमेह आणि उच्च रक्तदाब यावर नियंत्रण हार्ट अटॅक टाळण्यासाठी काय करावे ? हृदयविकारास कारणीभूत होणार्‍या रक्तवाहिन्या चरबीच्या अंतर्लेपाने जाड होण्याची प्रक्रिया कोणत्याही एकाच कारणाने होत नसते. संशोधनांती अशा अनेक गोष्टी आढळून आल्या आहेत की ज्यामुळे हा विकार वाढीस लागतो त्यांना रिस्क फॅक्टर्स म्हणतात. त्यापैकी बरीच कारणे टाळता येण्यासारखी असतात. ती दूर ठेवणे  अत्यंत गरजेचे आहे. स्निग्धाहार आपल्या आहारात चरबीयुक्त व स्निग्ध पदार्थ जास्त प्रमाणात असल्यास ती रक्तात कोलेस्टेरॉल व त्यासारखी इतर द्रव्ये वाढतात. त्यांचा थर रोहिण्यांच्या आतील मुलायम भागावर जमू लागतो. रोहिण्यांची पोकळी कमी कमी होऊ लागते व शरीरातील अवयवांच्या रक्तपुरवठ्यात घट पडू लागते. इतर अवयवांच्या मानाने हृदय आणि मेंदू कितीतरी अधिक नाजूक आहेत. त्यांना जरासुद्धा प्राणवायूचा व पोषणाचा तुटवडा सोसत नाही. परिणामी स्निग्धताप्रधान आहार हा धोकादायक बनतो...