मासिक पाळीतील वेदना दूर करण्यासाठी घरगुती उपाय
मासिक पाळीतील वेदना दूर करण्यासाठी घरगुती उपाय (How To Reduce Menstrual Pain In Marathi) मासिक पाळी ही महिलांमधील एक नैसर्गिक शारीरिक क्रिया आहे. मात्र बऱ्याचदा अचानक घरी आलेल्या पाहुण्यांप्रमाणे मासिक पाळी देखील कोणत्याही क्षणी येते. दर महिन्याला महिलांना मासिक पाळीला सामोरं जावंच लागतं. काही महिलांमध्ये मासिक पाळीचा फ्लो हा साधारणपणे तीन-चार दिवस असतो. तर काही महिलांना अगदी पाच ते सात दिवस मासिक पाळी येते. प्रत्येक महिलांची शारीरिक रचना, आहार, जीवनशैली निरनिराळी असल्याने मासिक पाळीचा त्रासदेखील प्रत्येकीचा वेगवेगळा असू शकतो. मासिक पाळीत काहीच्या पोटात वेदना होतात. तर काहींची कंबर या दिवसांमध्ये खूप दुखते. कोणाच्या छातीमध्ये जडपणा येतो तर कुण्याच्या पायाच्या पोटऱ्या दुखतात. काही जणींना मासिक पाळी येण्याआधी काही दिवस डोकेदुखीचा त्रास होतो तर काहींना मासिक पाळी सुरू असताना पोटात असह्य वेदना होतात. थोडक्यात प्रत्येक महिलेला मासिक पाळी सुरू असताना वेदना, क्रॅम्प सहन करावेच लागतात. शिक्षण अथवा कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांसाठी हा त्रास सहन करणं फारच कठीण असतं. फार कमी ...