पोषण आणि आरोग्य
पोषण आणि आरोग्य वाढ आणि विकास सकस अन्न न खाल्ल्यामुळे होणारे आजार विशिष्ट कमतरता (Specific Deficiency) जंतुसंसर्गास प्रतिकार वाढ आणि विकास वाढ आणि विकास सर्वसामान्य तऱ्हेने होण्यासाठी सुयोग्य पोषण आवश्यक असते. कुपोषणामुळे केवळ शारीरिक वाढ व विकास नव्हे त व्यक्तिच्या बौद्धिक क्षमतेवर तसेच आकलन शक्ती व वर्तनावर विपरीत परिणाम होतात. गरोदरपणात स्त्रीचे कुपोषण झाल्यास गर्भावर त्याचे वाईट परिणाम होतात. जसे की, मृत अपत्याचा जन्म, अपुऱ्या दिवसाचे मूल, पूर्ण दिवसाचे पण अपुऱ्या वाढीचे मुल इ. बालपणीच्या पूर्वार्धात कुपोषणामुळे शारीरिक व मानसिक वाढ मंद होते. अशी बालके माईल स्टोन (मैलांचे दगड) फार हळुहळु वाढतात. माईल स्टोन म्हणजे – ठराविक कालावधीत बालकांच्या शारीरिक व मानसिक वाढ व विकासाने गाठलेल्या टप्पा अशी मुले शाळेतल्या अभ्यासातही मागे पडतात. प्रौढामध्ये देखिल सुयोग्य आरोग्य आणि कार्यक्षमता टिकवण्यासाठी चांगल्या पोषणाची आवश्यकता असते. थोडक्यात आपणास असे म्हणता येईल की, पोषणाचे बरे वाईट परिणाम माणसाच्या आयुष्यावर जन्मापासून मृत्यू पर्यंत होत असतात. सकस अन्न न खाल...