मूड चांगला राहण्यासाठी करा या ७ गोष्टी


          मानसिक आरोग्य चांगले असेल तर शारीरिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. यासाठी ताणतणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. जीवनशैलीमध्ये काही सकारात्मक बदल करावे. यामुळे तुम्हाला नक्कीच मदत मिळेल. 

      सध्या शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य जपण गरजेचं आहे. स्वत:ला आवडेल ते करण्यात किंवा छंद जोपासण्यात मन गुंतवल्यास ऊर्जा मिळते आणि उत्साह वाढतो. स्वत:ला पुरेसा वेळ द्यायची सवय लावून घेणं आवश्यक आहे. मूड चांगला राहण्यासाठी काही खास टिप्स :- 




१. निसर्गाच्या सान्निध्यात 

वृक्षांच्या सान्निध्यात हिरव्यागार वातावरणात राहिल्यानं मनाला आवश्यक असलेली शांती मिळते. मन प्रसन्न राहतं. तसेच रोगप्रतिकार शक्ती सुधारते. जपानी संस्कृतीत यालाच फॉरेस्ट बाथिंग असं म्हणतात. 

२. आत्मविश्वास वाढवा 

स्वत:ला सर्व गुण-दोषांसह स्वीकारणं अत्यंत गरजेचं आहे. स्वत:ला कमी लेखण्याची चूक करू नका. स्वत:शी संवाद साधा आणि इतरांशी संवाद साधताना व्यक्तीच्या आत्मविश्वासात भर पडते. 



३. गाणी ऐका 

तुम्हाला आवडणारी गाणी रोज ऐका. त्यामुळे मन:शांती मिळते. तुमच्या आवडत्या गाण्यांची प्लेलिस्ट तुमचा मूड क्षणात बदलू शकते. घरकाम किंवा इतर लहानसहान कामं करताना गाणी ऐका. यामुळे काम करण्याचा उत्साह वाढतो. 

५. आवडणाऱ्या कामांना प्राधान्य 

तुम्हाला आवडणाऱ्या आणि करू इच्छीणऱ्या कामांची स्वतंत्र यादी करा. ती कामं टप्प्याटप्प्यान पूर्ण करा. यामुळे काम करताना मजा येईल. 

६. योगा करा 

योगा केल्याने शक्ती आणि लवचिकता वाढते, असं अनेकदा ऐकलं आहे. तसंच योगा केल्याने ऊर्जा वाढते आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. 

७. करा ऑनलाईन डिटॉॉक्स 

लॉकडाउनच्या काळात अनेक जन तासनतास सोशल मिडीयाचा वापर करत होते. सोशल मिडीयाच्या अतिवापराने डोळ्यांवर ताण येतो. म्हणून आठवड्यातील एक दिवस ऑनलाईन डिटॉॉक्स करा. म्हणजेच मोबाईल, लॅॅपटॉप अशा उपकरणांचा वापर करू नका. त्या दिवशी सोशल मिडीयाचा वापर करण कटाक्षानं टाळा मित्र- मैत्रिणीशी गप्पा मारा, स्वत:साठी वेळ काढा.  


Comments

Popular posts from this blog

Monday to Sunday! These 7 Healthy Detox Waters By Day Will Keep You Healthy English helth Tips

LDL Cholesterol Reducing Tips : This blue tea will help remove the dirt accumulated in the veins, Natural and Home Remedies for LDL Cholesterol English helth Tips

ठंडे पानी के स्वास्थ्य लाभ Hindi Helth Tips