रोज सकाळी चालण्याचा व्यायाम करण्याचे फायदे


 

चालण्याचा व्यायाम :- निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम करणे गरजेचे असते. व्यायाम हा चालणे, पाळणे, दोरीउड्या, मैदानी खेळ, जिना चढणे, सायकलिंग, पोहणे, वजन उचलणे अशा अनेक प्रकारांनी करता येतो. यापैकी सर्वात सोपा आणि स्वस्त व्यायाम प्रकार कोणता असेल तर तो चालण्याचा व्यायाम हा आहे.
 

चालण्याचा व्यायाम करण्याचे फायदे :- 

  • शरीर मजबूत होते :- नियमित चालल्याने मांसपेशी, हाडे व सांधे मजबूत होतात त्यामुळे शारीरिक स्टॅॅमिना वाढतो. 
  • रक्तप्रवाह व्यवस्थित होतो :- दररोज चालण्याचा व्यायाम केल्याने शरीरात रक्तप्रवाह व्यवस्थित होते. त्यामुळे शरीरातील हृदय, मेंदू सारख्या सर्वच महत्वाच्या अवयवात ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा व्यवस्थित होतो. 
  • ब्लडप्रेशर नियंत्रित राहतो :- नियमित चालण्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहते. त्यामुळे हाय ब्लडप्रेशरचा त्रास होत नाही. ब्लडप्रेशर नियंत्रित असणे खूप महत्वाचे आहे. कारण वाढलेल्या ब्लडप्रेशरमुळे हार्ट अटॅक, पक्षाघात, किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित चालण्याचा व्यायाम करणे उपयुक्त ठरते.
     
  • डायबेटीसमध्ये उपयुक्त :- चालण्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित होऊन मधुमेह आटोक्यात राहण्यास मदत होते. मधुमेही रुग्णासाठी चालणे हा एक चांगला व्यायाम प्रकार आहे. 
  • वजन आटोक्यात राहते :- नियमित चालण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते, शरीरातील चरबी कमी होते. त्यामुळे लट्ठपणाची समस्या असल्यास चालण्याचा व्यायाम आवर्जून करा. यामुळे शरीरातील चरबी कमी होऊन शरीर मजबूत होईल. 

Comments

Popular posts from this blog

Monday to Sunday! These 7 Healthy Detox Waters By Day Will Keep You Healthy English helth Tips

LDL Cholesterol Reducing Tips : This blue tea will help remove the dirt accumulated in the veins, Natural and Home Remedies for LDL Cholesterol English helth Tips

ठंडे पानी के स्वास्थ्य लाभ Hindi Helth Tips