तुमचे आवडीचे पदार्थ खाऊनही होऊ शकत तुमचं वजन कमी



 
डाएटचा ८०/२० नियम काय सांगतो ? 

       वजन कमी करण्यासाठी आपण सगळे डाएट तर करतो.मात्र ८०/२० हा नियम काय आहे, हे फार कमी लोकांना माहित असेल, डाएटच्या या नियमानुसार, याअंतर्गत तुम्हाला ८० टक्के पौष्टिक आहार आणि २० टक्के तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ खाऊ शकता. 

      या डाएटचा नियम तुम्हाला फॉलो करताना कॅलरीज तसच कार्ब्स काउंट करण्याची देखील गरज नाहीये. त्यामुळे या नियमानुसार, तुम्ही केवळ डाएट फूड न खाता तुमच्या आवडीचे पदार्थ खाऊ शकता. 

कसा फॉलो कराल ८०/२० डाएटचा नियम ? 

        हे डाएट करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, तुम्ही तुमच्या आहारामध्ये विविध रंगाच्या भाज्यांचा अधिक समावेश केला पाहिजे. तसेच ज्या भाज्यांमुळे पचनक्रिया सुधारेल अशा भाज्यांचा आणि फळांचा तुमच्या आहारात समावेश करावा, यामध्ये सिझनल भाज्या आणि फळांचा समावेश व्हायला हवा. 



८० टक्के डाएटमध्ये काय समाविष्ट कराल ? 

        पौष्टिक आहारामध्ये तुम्ही भाज्या, फळ, मासे आणि चिकन यांचा समावेश करू शकता. त्याचप्रमाणे, डेअरी प्रोडक्ट चाही तुम्ही समावेश करू शकता वजन कमी करण्यासाठी तुम्ही फॅॅट फ्री दुधाचा वापर करू शकता. 

आवडीच्या गोष्टींमध्ये कशाचा समावेश कराल ? 

         यामध्ये तुम्ही त्या खाद्यपदार्थांचा समावेश करावा, जे तुम्हाला भरपूर आवडतात, यामध्ये सॅॅच्युरेडेट फॅॅट, रेड मीट, अल्कोहोल, साखरयुक्त पदार्थांचा समावेश करू शकता. मात्र हे खाताना त्याच्या प्रमाणात कधीही वाढ होणार नाही याची काळजी घ्या. 

Comments

Popular posts from this blog

Monday to Sunday! These 7 Healthy Detox Waters By Day Will Keep You Healthy English helth Tips

LDL Cholesterol Reducing Tips : This blue tea will help remove the dirt accumulated in the veins, Natural and Home Remedies for LDL Cholesterol English helth Tips

ठंडे पानी के स्वास्थ्य लाभ Hindi Helth Tips