पोटात नळ येणे याची कारणे व उपाय

 



पोटात नळ येणे :- 

     काहीवेळा आपली बेंबी ही थोडी सरकते. यामुळे पोटात जोरात दुखू लागते. तसेच पोटावर थोडी सूज आल्याचेही दिसते. या त्रासाला "पोटात नळ भरणे" असे म्हणतात. 

पोटात नळ भरणे याची कारणे :- 

     जड वजनदार वस्तू उचलणे, अचानक खाली वाकणे, खेलकुद अशा कारणांनी आपली बेंबी थोडीशी बाजूला सरकते. बेंबी सरकल्याने पोटात जोरात दुखू लागते आणि जोवर सरकलेली बेंबी आपल्या मूळ ठिकाणी येत नाही तोवर पोट दुखत असते. तसेच पुढे वाकताना, वस्तू उचलताना यावेळी त्रास होऊ लागतो. 

पोटात नळ भरणे यामध्ये होणारे त्रास :- 

       पोटात नळ आल्यावर पुढे वाकताना, वस्तू उचलताना पोट दुखू लागते, उलटी किंवा मळमळ होणे, महिलांमध्ये मासिक पाळीत अधिक पोट दुखणे असे त्रास जाणवू शकतात. 

पोटात नळ येणे यावर घरगुती उपाय :- 

       पोटात नळ आल्यावर उपाशीपोटी मोहरीच्या तेलाचे काही थेंब नाभीत घालावे. हा उपाय ३ ते ४ दिवस करावा. या उपायाने त्रास कमी होण्यास मदत होते. पोटात नळ आल्यावर बेंबी जवळ एरंडेल तेल लावावे. व बेंबीभोवती हळुवार मालिश करावी. पोटात नळ आल्यास उपाशीपोटी १० ग्रॅॅम बडीशेप व २० ग्रॅॅम गूळ बारीक करून खावे. हे उपाय पोटात नळ भरणे यावर उपयोगी पडतात. 


दिव्याचा उपाय :- 

     पाठीवर झोपून पोटावर छोटा दिवा ठेऊन त्यावर तांब्या झाकावा. यामुळे दिवा आपोआप विजतो व तांब्याच्या आत Vacuum तयार होतो. त्यानंतर नाभी योग्य ठिकाणी येण्यासाठी त्या बाजूला हळूवार तांब्या नेला जातो. या उपायाने पोटात नळ येणे हा त्रास कमी होण्यास मदत होते. मात्र हा उपाय अनुभवी व्यक्तीने करणे आवश्यक आहे. 

पोटात नळ आल्यास घ्यायची काळजी :- 

  • काही दिवस जड वस्तू उचलणे टाळावे. 
  • पोटात नळ भरणे यावर आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. 
  • घरगुती उपाय करूनही पोटात होणाऱ्या वेदना कमी होत नसल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. 

Comments

Popular posts from this blog

Monday to Sunday! These 7 Healthy Detox Waters By Day Will Keep You Healthy English helth Tips

LDL Cholesterol Reducing Tips : This blue tea will help remove the dirt accumulated in the veins, Natural and Home Remedies for LDL Cholesterol English helth Tips

ठंडे पानी के स्वास्थ्य लाभ Hindi Helth Tips