या २ कारणांमुळे कमजोर होत आपलं हृद्य, 'या' ५ फळांचे सेवन केल्यास दूर होईल धोका!


          आपलं हृद्य कमजोर होण्यापासून बचाव करण्याची पद्धत आपल्याला माहित हवी. इथे जाणून घ्या कशा पद्धतीने आपण आपली कार्डीयोवस्कूलर हेल्थ फिट अँँड फाईन ठेऊ शकता. 

       या सर्वांचा थेट परिणाम सर्वाधिक करून आपल्या हृदयावर होतो. पूर्वी अगदी जेष्ठ असणाऱ्या लोकांना हृदयाचेरोग जडायचे पण आता लहान वयात सुध्दा तरुणांना हृदयाच्या त्रासाला सामोरे जावे लागते. अगदी तिशी सुध्दा न गाठलेले कित्येक तरूण हृद्य विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यूमुखी पावल्याची उदाहरणे आहेत. तुम्हाला हे सर्व सहन करायचे नसेल तर तुम्ही आतापासूनच आपल्या हृदयाची काळजी घेण्यास सुरुवात केली पाहिजे. आपण  जाणून घेऊया कि कोणत्या २ प्रकारामुळे हृद्य कमजोर होते. 




मानसिक आणि शारीरिक परिणाम :-

तर हेच ते २ प्रकार आहेत ज्यामुळे आपले हृद्य कमजोर होते. ताण तणाव, चिंता, नैराश्य, सतत विचार करत राहणे या गोष्टी जरी कल्पनात्मक असल्या तरी त्या खऱ्या आहेत आणि त्या आपल्या शरीराच्या अवयवांवर खूप मोठे दुष्परिणाम करतात. त्यापैकी सर्वाधिक जास्त परिणाम हा हृदयावर होत असल्याचे दिसून आले आहे. जर मानसिक परिणाम हृदयावर होऊ द्यायचे नसतील तर सर्वात सोप्पा उपाय आहे आनंदी राहणे आणि मनाला शांत ठेवणे. जर तुम्ही चिंता, नैराश्य, ताण, तणाव यांना जवळ येऊ दिलेच नाही तर तुमच्या हृदयावर त्याचा परिणाम होणार नाही. यासाठी खूप व्यायाम करा. योग करा आणि निरोगी रहा. दुसरा प्रकार म्हणजे शारीरिक होय, जो कि चुकीची जीवनशैली आणि आहार यांमुळे हृदयावर परिणाम करतो. यासाठी शक्य तितका चांगला आहार घेणे आणि उत्तम जीवन जगणे क्रमप्राप्त आहे. 




हे ५ पदार्थ खा. 

जर तुम्हाला तुमचे हृद्य निरोगी राखायचे असेल तर असे काही पदार्थ आहे जे तुम्ही खाणे गरजेचे आहे. जाणकारांनी सुध्दा हे पदार्थ हृदयासाठी अतिशय चांगले असल्याचे कबूल केले आहे. जे व्यक्ती ह्या ५ पदार्थांचे सेवन करतात त्यांना क्वचितच हृदयाचा त्रास होतो, परंतु त्यासाठी नियमित रूपाने हे पदार्थ खाणे गरजेचे आहे. 

दही


 
उन्हाळ्याच्या दिवसांत सर्वाधिक सेवन केले जाणारे दही तुम्ही नियमितपणे खाल्ले तरी त्याचे तुम्हाला मोठे लाभ दिसून येतील. दही शरीराच्या आतील नसांना पोषण देण्याचे काम करते. शिवाय आपली त्वचा सुध्दा निरोगी आणि मुलायम राखते. यांचा एकंदर परिणाम म्हणून रक्त प्रवाह सुरळीत होतो व हृदयावरचा ताण कमी होतो. 

ड्रायफ्रुट्स आणि डेअरी प्राॅॅडकट्स :- 

कार्डीयोवस्कुलर हेल्थसाठी नट्स अर्थात ड्राय फ्रुट्स अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आणि म्हणूनच जाणकार सुध्दा उत्तम आरोग्यासाठी नियमितपणे ड्राय फ्रुट्स खाण्याचा सल्ला देतात. काजू, मनुके, बदाम, अक्रोड, खजूर यांसारखे ड्राय फ्रुट्स हृदयाला पोषण देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. अतिप्रमाणात तुपाचे सेवन करू नये खास करून देशी तुपाचे सेवन कमी करावे. डेअरी प्राॅॅडक्टस म्हणजे दुधापासून तयार केले जाणारे प्राॅॅडक्टस होय. दुध, तूप, पनीर, ताक यांसारखे डेअरी प्राॅॅडक्टस हृदयाच्या कार्य प्रणालीला सुरळीत राखतात. 

डाळिंब आणि अननस :- 

हृद्य निरोगी राखण्यासाठी फळांचे सेवन करणे सुध्दा अत्यंत गरजेचे आहे आणि खास करून डाळिंब आणि अननस यांचे सेवन तुम्ही आवर्जून करायला हवे. ही फळे शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात आणि हृदयाच्या उत्तम आरोग्याला हातभार लावतात. तर म्हणून हे ५ पदार्थ तुम्ही आवर्जून व नियमित खा आणि तुमच्या हृदयाला निरोगी राखा. कारण हृद्य निरोगी असले तर तुम्ही सुध्दा उत्तम आणि आरोग्यवर्धक आयुष्य जगाल.    

Comments

Popular posts from this blog

Monday to Sunday! These 7 Healthy Detox Waters By Day Will Keep You Healthy English helth Tips

LDL Cholesterol Reducing Tips : This blue tea will help remove the dirt accumulated in the veins, Natural and Home Remedies for LDL Cholesterol English helth Tips

ठंडे पानी के स्वास्थ्य लाभ Hindi Helth Tips