वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रभावी उपाय


      

          लठ्ठपणा एक आजार असून यामुळे केवळ पर्सनॅॅलिटी खराब होत नाही तर हा इतर आजारांनाही आमंत्रण देतो. लठ्ठपणा वाढल्यास हाय ब्लडप्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक डायटींग करतात किंवा तास न तास जिममध्ये घाम गळतात परंतु तरीही वजन कमी होत नाही. कारण त्यांचा डाएट चार्ट योग्य नसतो. आहाराकडे योग्य लक्ष आणि थोडासा व्यायाम केल्याने वजन लवकर कमी करणे शक्य आहे. वजन कमी करण्यासाठी छोटे छोटे उपाय पुढीलप्रमाणे यामुळे तुमचे वजन कमी होऊ लागेल.....


  1. पपईचे नियमित सेवन करावे, हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते. पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते. 
  2. दह्याचे सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. दिवसातून दोन-तीन वेळेस तक प्यावे. 
  3. पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या, दररोज तीन ग्रॅॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होईल. 
  4. आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून चूर्ण तयार करा. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. या उपायाने वजन जलद गतीने कमी होऊ लागेल. 
  5. वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टोन्ड दूध, टोन्ड दही आणि टोन्ड पनीरचा वापर करावा. या पदार्थांमध्ये कॅलरी कमी असतात, परंतु पोट भरलेले जाणवते. 
  6. दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालावे, कमीत कमी ४ किलोमीटर चालण्याचा नियम करावा. दुपारचे जेवण केल्यानंतर शतपावली अवश्य करावी. जर तुम्ही रात्री ८.३० नंतर जेवण करत असाल तर पोळी आणि भाताऐवजी डाळ आणि भाज्यांना जास्त प्राथमिकता द्या, रात्री हलका आहार घ्यावा.
  7. वजन लवकर कमी करण्याची इच्छा असेल तर जास्त प्रमाणात पांढरे पदार्थ (बटाटे, मैदा, साखर, तांदूळ) कमी करा आणि मल्टीग्रेन किंवा मल्टीकलर पदार्थ (डाळ, गहू, गाजर, पालक, सफरचंद, पपई) खाण्यावर जास्त भर द्या.
 

Comments

Popular posts from this blog

Use of Ritha

Side effects of eating too much mango English helth Tips

Jujube