जखमेचे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय


 

        कधी काम करताना, कधी खेळताना तर कधी एखाद्या अपघातामुळे आपल्या चेहऱ्यावर आणि अंगावर जखमा होतात. ही जखम भरून येण्यास ठराविक काळ जावा लागतो. मात्र, कधीकधी ही जखम बरी झाली तरी त्याचा डाग तसाच राहतो. शरीरावर राहिलेल्या या डागामुळे आपली चिडचिडही होते. कढी एखाद्या कार्यक्रमाला जाताना तर या डागाचे काय करावे असे होते. मग आपण डॉक्टरकडे किंवा पार्लरमध्ये जाऊन काही उपाय करून पाहतो. मात्र, या सगळ्यात बरेच पैसे खर्च होतात. पण याआधी काही घरगुती सोपे उपाय करून पाहिल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. काय आहेत या टिप्स पाहूया.

 

  • लिंबू आणि टोमॅॅटोचा रस 
लिंबू आणि टोमॅॅटो हे आपल्या घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी आहे. जखम थोडीशी बरी झाल्यानंतर हा उपाय करू शकता. साध्या पाण्याने जखमेचा भाग धुवून घ्या. त्यावर ओला आणि स्वच्छ कपडा ठेवा. काही तासाने ताज्या लिंबाच्या रसात बुडवलेले कापड या जखमेवर ठेवा. त्वचा सुकल्यानंतर तुम्ही त्यावर टोमॅॅटोचा रसही लावू शकता. असे दिवसातून दोन वेळा केल्यास जखमेचा डाग कमी होण्यास मदत होईल. लिंबातील अॅॅसिडीक घटक नैसर्गिकरीत्या व्रणांंचे डाग कमी करतात तर ताज्या टोमॅॅटोच्या रसामध्ये ब्लिचिंग घटक असल्याने व्रण कमी होण्यास मदत होते.
 

  • बदामाचंं तेल 
बदामाचंं तेल जखमेवर लावल्यास तुम्हाला त्यापासून लवकर आराम मिळेल. दिवसातून दोनदा हे तेल जखमेवर लावून हलका मसाज करावा.

  • मेथी व हळद 
मेथीचे दाणे रात्रभर भिजवून सकाळी त्याची पेस्ट बनवा. तयार पेस्ट जखमेवर लावा व पूर्ण सुकल्यावर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. मेथीप्रमाणेच हळदीची पेस्ट बनवून लावल्यास जखम लवकर भरण्यास तसेच व्रण दूर होण्यास मदत होते.
 

  • बटाट्याची सालंं
बटाट्याच्या सालांमध्ये अँँटी-बॅॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे जखम लवकर बरी होते. यासाठी बटाट्याची साल काढून ती जखमेवर लावा. मात्र ही सालंं स्वच्छ धुवून घेतलेली असायला हवीत. 

Comments

Popular posts from this blog

Monday to Sunday! These 7 Healthy Detox Waters By Day Will Keep You Healthy English helth Tips

LDL Cholesterol Reducing Tips : This blue tea will help remove the dirt accumulated in the veins, Natural and Home Remedies for LDL Cholesterol English helth Tips

ठंडे पानी के स्वास्थ्य लाभ Hindi Helth Tips