चामखीळ घालवण्यासाठी ६ घरगुती उपाय


         अनेक लोकांना अंगावर मोस असण्याची समस्या असते. अनेकांच्या स्किनवर मोस असते. शरीरातील ह्युमन पापिल्लोमा व्हायरसमुळे अंगावर मोस येतात. जे शरीरासाठी धोकादायक नसतात पण शरीराची सुंदरता खराब करतात. 

         स्कीन ट्युमरच्या नावाने देखील हा ओळखला जातो. अनेकदा त्वचेवरील असमान वृद्धीमुळे देखील शरीरावर मोस तयार होतात. काही घरगुती उपायांनी तुम्ही देखील ते शरीरावरून नाहीसे करू शकतात.
 





मोस नाहीसे करण्यासाठी ६ घरगुती उपाय :- 

१) सफरचंदचं व्हिनेगर :- 

मोसच्या समस्या मुळापासून दूर करण्यासाठी हे अधिक फायदेशीर असत. रोज कमीत कमी ३ वेळा कापसाने मोसवर हे व्हिनेगार लावा आणि कापूस त्यावर लावून ठेवा. काही दिवसानंतर मोसचा रंग बदलेल आणि तो सुखत जाईल. या शिवाय तुम्ही अॅॅलोविराचं जेल देखील लावू शकतात. 



२) लिंबाचा रस :-

लिंबाचा रस मोस्क्या जागेवर लावल्याने याची समस्या दूर होते. कापसाने लिंबूचा रस मोसवर लावा आणि त्यावर कापूस तसाच ठेवून द्या. 






३) बटाट्याचा रस :- 

बटाट्याचा रस किंवा बटाटा बारीक करून मोसच्या जागी लावल्याने हळूहळू कमी होण्यास मदत होते. 






४) अननसाचा रस :- 

मोसपासून सुटका मिळण्यासाठी तुम्ही अननस रस,  फ्लॉवर रस, कांद्याचा रस आणि मध वापरू शकता. कारण या सगळ्यांमध्ये मोसला नाहीसा करण्यासाठीच ऐजाईम्स असतात. 




५) बेकिंग सोडा :-

चांगल्या त्वचेसाठी फायदेशीर असलेला बेकिंग सोडा मोसवर देखील फायदेशीर आहे. बेकिंग सोडा ऐरंडीच्या तेलामध्ये टाकून पेस्ट तयार करा आणि मोसवर ती पेस्ट लावा. काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसेल.  लसूण :- 




६) लसूण :- 

लसूणचं सेवन अनेक समस्यांपासून लांब राहण्यासाठी महत्त्वाचं आहे. सुंदरतेसाठी देखील लसूण तेवढाच फायदेशीर आहे. लसूणच्या पाकळ्या मोसवर घासा किंवा त्याची पेस्ट मोसवर लावा. असं केल्यास काही दिवसात तुम्हाला फरक जाणवेल. 

Comments

Popular posts from this blog

Monday to Sunday! These 7 Healthy Detox Waters By Day Will Keep You Healthy English helth Tips

LDL Cholesterol Reducing Tips : This blue tea will help remove the dirt accumulated in the veins, Natural and Home Remedies for LDL Cholesterol English helth Tips

ठंडे पानी के स्वास्थ्य लाभ Hindi Helth Tips