तुम्ही झोपल्यानंतर घोरता, मग हे घरगुती उपाय कराच !

        घोरण्यामुळे अनेक व्यक्तींना अपमान सहन करावा लागतो. रात्री झोपल्यावर घोरणाऱ्या व्यक्तीमुळे अनेकांची झोप होत नाही. आपण झोपले असल्याने आपल्याला नाही कळत आपण घोरतोय ते पण सकाळी उठल्यावर जेव्हा लोकं सांगतात तुम्ही घोरत होतात आणि त्यामुळे आमची झोप झाली नाही. तर आपला अपमान झाल्यासारखा वाटत. घोरण्यावर काही घरगुती उपाय आहेत ते आज तुम्हाला सांगणार आहोत. 

घोरण्याच्या समस्येवर घरगुती उपाय :- 

१) हळद :- हळद ही त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी उत्तम औषध आहे. नाक साफ करायला हळदीचा उपयोग केला जातो. नाक साफ झाल्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत नाही, आणि त्यामुळे तुम्ही घोरत नाही. म्हणून रोज रात्री झोपताना हळदीचं दूध घेणे खूप फायदेशीर आहे. 

२) ऑलिव्ह ऑयल :- ऑलिव्ह ऑयलमुळे तुमची घोरण्याची समस्या कमी होण्यास मदत होते. ऑलिव्ह ऑयलमुळे तुम्ही नाक साफ केल्यास श्वास घेण्यास सोप होईल. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑयलचे दोन थेंब नाकात घाला आणि मग झोपा. यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास मदत होईल.                              

३)  देशी तूप :- तज्ञ्जांनुसार नाक साफ नसल्यास तुम्हाला घोरण्याची समस्या असू शकते. त्यामुळे नाक साफ असणे फार गरजेचं आहे. त्यामुळे रोज झोपण्यापूर्वी देशी तूप जरा कोमट गरम करा आणि ते नाकात टाका. यामुळे घोरण्याची समस्या कमी होईल. 

४) लसूण:- घोरण्याच्या समस्येवर लसूण हे रामबाण उपाय आहे. लसूणचं सेवन केल्यामुळे तुम्ही घोरण्याच्या समस्येपासून मुक्ता मिळू शकते. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत दोन तीन लसूण खा. 

५) पुदीना :- पुदीनाचाही खूप फायदा आहे. पुदीनाला पाण्यामध्ये उकळा त्यानंतर हे पाणी कोमट झाल्यावर त्याने गुळण्या करा. अगदी हे पाणी प्यायला तरी याचा खूप फायदा होतो. त्यामुळे रोज रात्री हा उपाय केल्यास काही दिवसांनी तुमची घोरण्याची समस्या कमी होईल. 

६) हळद आणि मध :- रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात एक चमचा हळद आणि एक चमचा मध याच सेवन करा. रोज काही दिवस हे केल्याने तुमची घोरण्याची समस्या कमी होईल. 

७) वेलची पावडर :- रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात वेलची पावडर टाकून ते पाणी प्या. याचाही खूप फायदा होतो. आरोग्यासंदर्भात कुठलीही समस्या असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्याची कुठलीही समस्या हि एखाद्या आजाराच लक्षण असू शकते. त्यामुळे आपल्या फॅॅमिली डॉक्टरला त्यासंदर्भात नक्की सांगा.  




 

Comments

Popular posts from this blog

Monday to Sunday! These 7 Healthy Detox Waters By Day Will Keep You Healthy English helth Tips

LDL Cholesterol Reducing Tips : This blue tea will help remove the dirt accumulated in the veins, Natural and Home Remedies for LDL Cholesterol English helth Tips

ठंडे पानी के स्वास्थ्य लाभ Hindi Helth Tips